आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

१३ गावांचे रस्ते होणार पक्के, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जिल्हयातील रस्त्यांचा असा कायापालट होणे अपेक्षित आहे. - Divya Marathi
जिल्हयातील रस्त्यांचा असा कायापालट होणे अपेक्षित आहे.
अमरावती - मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअतंर्गत जिल्ह्यातील रामा, शिंगणापूर, जसापूर, धानोरा, रामा वकनाथ, सोनेगाव, आजनगाव, माहुली कोठोडा, सार्सी, रामा, तरोडा धामंत्री, रामा बोरज नानोरी ही गावे जोडण्यासाठी शासनाने मंजूरी दिली आहे. या रस्त्यांच्या कामासाठी शाससाने १४ कोटी १२ लाख १८ हजार रुपये मंजूर केले अाहे.
पंतप्रधान ग्रामसडक योजनेच्या धर्तीवर रस्त्यांअभावी मागास राहिलेल्या गावांच्या विकासासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजना राबवण्यात येत आहे. या अंतर्गंत अद्यापही रस्त्याने जोडण्यात आलेली गावे आता पक्क्या रस्त्याने जोडली जाणार आहे. या अंतर्गंत चांदूर बाजार तालुक्यातील रामा-बोरज नानोरी या ४.१० किमीच्या रस्ता बांधकामास शासानाने मंजूरी दिली आहे. या कामासाठी कोटी २६ लाख २० हजार रुपये मंजूर करण्यात आले असून, पुढील पाच वर्षे रस्त्यांच्या देखभाल दुरूस्तीसाठीही १५ लाख ८३ हजार रुपयांच्या निधी साठी शासनाने मंजूरी दिली आहे. या या योजनेअतंर्गंत दर्यापूर तालुक्यातील रामा-शिंगणापूर-जसापूर-धानोरा-नायगाव या ७.५ किमी अंतराच्या रस्त्यासाठी कोटी ४२ लाख ९४ हजार तर देखभाल दुरूस्तीसाठी ३१.०१ लाख, धामणगाव रेल्वे तालुक्यातील रामा वकनाथ-सोनेगाव-आजनगाव या ९.१८ किमीच्या रस्त्यासाठी कोटी ८३ लक्ष ६७ हजार तर देखभाल-दुरूस्तीसाठी १९.८६, नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील माहुली कोठोडा-सार्सी या ५.७० किमीच्या रस्त्यासाठी एक कोटी ८६ लक्ष ७७ हजार तर देखभाल-दुरूस्तीसाठी १३.०७, तिवसा तालुक्यातील रामा-तरोडा-धामंत्री या ७.८० किमीच्या रस्त्यासाठी कोटी ७२ लाख ६० हजार तर देखभाल दुरूस्तीसाठी १९.०८ लक्ष रुपये मंजूर करण्यात आले आहे. संबंधित रस्त्यांच्या कामास मंजुरू देण्यापुर्वी काम सुरू करण्यापुर्वी रस्त्यांच्या कामाचे मोजमाप काटेकोर तपासण्यात येऊन संकल्पन निश्चित करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. या रस्त्यांसाठी लागणारी जमीन संबंधित विभागाच्या ताब्यात आहे किंवा नाही याची खातरजमा करूनच रस्त्याचे बांधकाम करावे लागणार आहे. रस्त्यांसाठी आवश्यक असणारी जमीन इतर खात्यांच्या ताब्यात असल्यास ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक असलेल्या रस्त्याची कामे हाती घेण्यात येऊ नये याबाबत खातमजमा करण्याचे निर्देशात सांगण्यात आलेे. संबंधित रस्त्यांचे भूखंड पाटबंधारे, पाणीपुरवठा, जलाशयाखाली जाणार नसल्याची खात्री संबंधित विभागाला करावी लागणार आहे.
रस्त्यांची एकूण लांबी ३३.८३ किमी
दुरूस्ती निधी
९८.८५ लाख रुपये
मंजुर निधी
१४ कोटी १२ लाख १८ हजार रुपये
बातम्या आणखी आहेत...