आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हाईटमनीसाठी संस्था सचिवाची कर्मचाऱ्यांच्या मानेवर कुऱ्हाड, चर्चेला आले उधाण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुसद - देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाचशे, हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णयाने गडगंज माया पुंजी जमवलेल्या धनदांडग्यांची झोप उडवली आहे. नोटा बदली करून घेण्यासाठी नाना खटपटी केल्या जात आहेत. कुणी बदनामीच्या भितीपोटी नोटा कचरा कुंडीत टाकुन दिल्या तर कुणी जाळून टाकल्याच्या बातम्याही वृत्तपत्रातून झळकल्या आहेत. मात्र, शहरातील काही नामांकित शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा सचिवाने वेगळीच शक्कल लढवली असून, काळा पैसा पांढरा करण्यासाठी कर्मचाऱ्याच्या मानगुटीवर कुऱ्हाड ठेवल्याच्या चर्चा समोर येत आहे.
शहराला शिक्षणाचे माहेर घर असल्याची ख्याती आहे. पुसद सारख्या तालुक्यात जवळपास सर्वच प्रकारचे शिक्षण उपलब्ध झाले आहे. शहरात शिक्षण संस्था मराठी, इंग्रजी माध्यमाची असुन उच्च माध्यमिक वरिष्ठ महाविद्यालय सुध्दा मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यामुळे शहराचे चांगलेच लौकीक आहे. शिवाय संस्थेचे पदसिध्द अध्यक्ष तथा सचिव सुध्दा मोठया सत्ताधाऱ्याची असल्यामुळे त्यांच्या विरोधात कुणाचीही बोलण्याची हिंमत होत नाही. ज्यांनी विरोध दर्शविला त्यांना कुठल्या ना कुठल्या वांद्यामध्ये अडकवण्याचा किंवा नोकरीवरून काढण्याच्या धमक्या दिल्या जातात. त्यामुळे कुणीही बोलण्यास तयार होत नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटा बंदीचा निर्णय काय घेतला परिणामी गैर मार्गाने धन जमवणाऱ्यांची झोपच उडाली आहे. पुसद सारख्या ठिकाणी मोठया प्रमाणावर काळा पैसा दडपल्याच्या एकच चर्चा आता बाहेर पडु लागल्या आहे. त्यामुळे काळा पैसा पांढरा करण्यासाठी पुसदमध्ये विविध प्रकारचे प्रयत्न केल्या जात आहे. तर काही बिल्डर्सने वेगवेगळया सल्ल्याच्या माध्यमातुन काळा पैसा पांढरा सुध्दा केल्याचे समोर येत आहे. शहरातील नामांकित अशा विद्यालय,महाविद्यालय बहुतांश इंग्रजी, मराठी माध्यमांच्या शिक्षण संस्थातील अध्यक्ष तथा सचिवांकडे मोठ्या प्रमाणावर काळा पैसा असल्याची चर्चा नेहमीच पुसदमध्ये होत असते. मात्र, काळा पैसा पांढरा करण्याची पंचायत निर्माण होत असतांना त्यासाठी वेगळीच शक्कल या संस्था चालकांनी लढवली आहे. शहरातील नामांकीत अशा राष्ट्रीय कृत बँकेचा आधारसुद्धा घेतल्या जात असल्याचे दिसून येत आहे.

संस्थाचालकाने त्यांच्या संस्थेवर काम करणारे कर्मचाऱ्याची आधार घेऊन काळा पैसा पांढरा करण्यासाठी खात्यात हळुहळु सरकवला जात असल्याच्या चर्चा पिडीत कर्मचारीकडुन केल्या जात आहे. त्यामुळे संस्थाचालक सचिवांनी कर्मचाऱ्याच्या मानगुटीवर जन कुऱ्हाडच ठेवून असे गैर कृत्य करण्याचे ठामपणे ठरवले असल्याचे समोर येत आहे. अशा गैर कृत्यामुळे संस्थाचालक चांगली झोप घेत असून, कर्मचाऱ्याची मात्र कार्यवाहीच्या भिती पोटी झोप उडाल्याचे समोर येत आहे.

मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेत मोठा घोळ
शहरातील नामांकित शिक्षण संस्थेला शासनाच्या विविध योजनेमधून पूर्ण पैसा मिळतो. हा पैसा विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी खर्च करण्याचा मानस संस्थेचा असतो. मात्र, हा पैसा दडपल्या जातो. त्यामुळे अशा संस्थेने केलेला घोळ छापे मारून काढण्याची मागणीसुद्धा सर्वच स्तरातून होत आहे.

कर्मचाऱ्यांच्या बँकेमध्ये येरझाऱ्या वाढल्या
शहरातील नामांकित अशा शिक्षण संस्थेचे कर्मचारी संस्थेचे काम सोडून काळा पैसा पांढरा करण्यासाठी बँकेत दररोज येरझाऱ्या मारत असल्याचे समोर येत आहे. कारण एकदाच एवढी मोठी रक्कम बाहेर काढणे शक्य नसल्यामुळे थोडया थोडया प्रमाणात रक्कम बाहेर काढल्या जात आहे.
बातम्या आणखी आहेत...