आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावती : भिंतीला छीद्र करून12 शिलाई मशीनसह LED केली लंपास

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
याच कार्यालयाच्या भितीला छिंद्र करुन चोरट्यांनी साहित्य चोरले. - Divya Marathi
याच कार्यालयाच्या भितीला छिंद्र करुन चोरट्यांनी साहित्य चोरले.
अमरावती - शहरातील हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या आवारात महाबँक ग्रामिण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेचे कार्यालय आहे. याच कार्यालयात कार्यशाळा हॉल, वर्गखोली आहे. याच कार्यालयाच्या तिन्ही भिंतीला छिद्र करून चोरट्यांनी आतमध्ये प्रवेश केला. यावेळी कार्यालयात असलेल्या १२ शिलाई मशिन एलसीडी चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना मंगळवारी (दि. ८) उघडकीस आली आहे. 
 
महाबँक ग्रामिण स्वयंरोजगार कार्यालय हे हनुमान व्यायाम प्रसारक मंडळात नाल्यालगत आहे. नाल्याची सरक्षक भिंत आणि महाबँक ग्रामिण कार्यालयाच्या मागील बाजूच्या भिंतीमध्ये जवळपास तीन ते चार फुट अंतर आहे. त्यामुळे याच गल्लीचा फायदा घेवून चोरट्यांनी कार्यशाळा हॉल, वर्गखोली ऑफीसच्या तिन्ही भिंती फोडून आत प्रवेश करण्यासाठी छिद्र केले. याच छिद्रातून चोरट्यांनी आतमध्ये प्रवेश करून त्याठिकाणी असलेल्या नविन सोळा शिलाई मशीनपैकी बारा मशीन लंपास केल्या. यामध्ये एक पिको मशीनसुध्दा होती. तसेच कार्यालयात 
असलेला एलसीडीसुध्दा चोरून नेला आहे. चोरट्यांनी लंपास केलेल्या एका मशीनची किंमत दीड हजार रुपये आहे. त्यामुळे एकूण १८ हजार रुपयांच्या मशीन विस हजार रुपयांची एलसीडी असा एकूण ३८ हजारांचा ऐवज लंपास केला आहे. चोरी झाल्याची माहीती राजापेठ पोलिस पथक घटनास्थळी रवाना झाले होते. या प्रकरणात अनिलकुमार रामधिन मंडळ (५९, रा. दत्त् कॉलनी, साईनगर, अमरावती ) यांच्या तक्रारीवरून राजापेठ पोलिसांनी मंगळवारी सांयकाळी अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. 
बातम्या आणखी आहेत...