आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावती: तृतीयपंथीयांचे दोन गट आमने-सामने, कोणत्यागटाने कोठे भिक्षा मागावी यावर वाद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- कोणत्या गटाने कोठे भिक्षा मागावी, कोठे फिरावे या कारणावरून शहरातील तृतीयपंथीयांचे दोन गट गुरुवारी(दि.२) आमने-सामने आल्याने कोतवाली पोलिस ठाण्यात तणावाची स्थिती निर्माण झाली होती. शेवटी काही नागरिकांनी पोलिसांनी मध्यस्थी करून दोन्ही गटांमध्ये समेट घडवून आणल्याने प्रकरण शांत झाले.
 
या दोन्ही गटात बुधवारी (दि. १) रात्रीपासून वाद सुरू होता. यातच एका गटाने बुधवारी रात्री फ्रेजरपुरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत दुसऱ्या गटातील काहींनी मारहाण केल्याचा आरोप करून तक्रार दिली होती.. दरम्यान गुरूवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास पाच ते सहा तृतीयपंथी एका प्रवासी ऑटोने जात असताना बसस्थानकाजवळ काही तृतीयपंथी त्यांच्यासोबत असलेल्या काही व्यक्तींनी या पाच ते सहा जणांवर हल्ला केला. या हल्ल्यात दोन तृतीयपंथी जखमी झाले. ते जखमी अवस्थेतच कोतवाली ठाण्यात पोहचले. याचवेळी मारहाण करणाऱ्या तृतीयपंथीयांसोबत असलेला एक व्यक्ती जखमी तृतीयपंथीयांना त्यांच्या सहकाऱ्यांना दिसला. त्यामुळे त्याचा मुख्य रस्त्यावर पाठलाग करण्यात आला. 

एका दुकानात जाऊन जखमी तृतीयपंथीयांनी त्या व्यक्तीला मारहाण केली. त्यानंतर हे दोन्ही गट पुन्हा कोतवाली ठाण्यात समोरासमोर आले, त्यामुळे काही वेळासाठी तणाव निर्माण झाला होता. मात्र पोलिसांनी अतिरीक्त पोलिस कुमक तैनात केली होती. तसेच शहरातील काही नागरिकांनी ठाण्यात येऊन एसीपी नरेंद्र गायकवाड तसेच प्रभारी ठाणेदार नीलिमा आरज यांच्यासमक्ष दोन्ही गटातील प्रमुख तृतीयपंथीयांसोबत चर्चा केली. शहरात कुणीही कोणत्याही ठिकाणी जाऊन भिक्षा मागावी, त्यासाठी कोणालाही बंधन राहणार नाही मात्र ज्या तृतीयापंथीयांचे ठरलेले ठिकाण किंवा सणाच्या वेळी ठराविक परिसरात दोन्ही गटातील व्यक्तींनी जाऊन वाद करू नये, असे ठरले. त्यामुळे पोलिसांनी दोन्ही गटाने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हे दाखल करता एनसी दाखल केल्या आहे. 

दोन्ही गटात समेट: तृतीयपंथीयांच्यादोन गटात वाद झाल्यामुळे दोन्ही गट ठाण्यात आले होते. एकमेकांविरुद्ध मारहाणीचा आरोप करत होते. दरम्यान काही नागरिकांनी मध्यस्थी केल्याने त्यांच्यात समेट झाल्याचे ठाणेदार नीलिमा आरज यांनी सांिगतले. 
बातम्या आणखी आहेत...