आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुकळी येथील ‘त्या’ शेतकऱ्यांची बनावट बियाण्यांमुळे फसवणूक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बोगस बियाणे दिल्यामुळे फसवणूक झालेले सुकळी येथील शेतकरी. प्रशासनाने आपल्याला न्याय द्यावा,अशी मागणी त्यांनी केली आहे. - Divya Marathi
बोगस बियाणे दिल्यामुळे फसवणूक झालेले सुकळी येथील शेतकरी. प्रशासनाने आपल्याला न्याय द्यावा,अशी मागणी त्यांनी केली आहे.
आर्णी- निसर्गाच्या लहरीपणामुळे आधीच शेतकऱ्यांच्या उत्पन्नात घट होत असतांना दुसरीकडे बियाणे कंपन्या सुद्धा बोगस बियाणे देऊन शेतकऱ्यांची फसवणूक करित असल्याचा प्रकार सुकळी येथे उघडकीस आला. 
 
दरम्यान या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील सुकळी येथील शेतकऱ्याने बिटीचे बोगस बियाणे देऊन फसवणूक केल्याची तक्रार कृषी अधिकारी त्यानंतर आर्णी पोलीस स्टेशन, जिल्हा कृषी अधीक्षक, जिल्हाधिकारी, आमदार, मंत्री यांना सतत तक्रार निवेदन देऊन मागील दोन वर्षापासुन येथील शेतकरी घनश्याम मारोती कापसे न्यायाचे प्रतीक्षा करीत आहे. माञ दुर्दैवाने दोन वर्षा पासुन सतत पाठपुरावा करून सुद्धा आर्णी येथील बियाण्याची विक्री करणाऱ्या कृषी केंद्रावर किंवा बोगस बियाणे पुरवठा करणाऱ्या कंपनीला प्रशासनाने दंड किंवा गुन्हा दाखल केलेला नाही.
 
कृषी विभागाने साधा खुलासा ही मागवलेला नाही. त्यामुळे खरीप हंगामाच्या तोंडावर जिल्हाधिकारी यांचे सह आढावा घेणारे आमदार मंत्री बोगस बियाणे विकणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे इशारे देतात. परंतु ते केवळ देखावाच असतो शेतकऱ्यांचा कुणीही वाली नाही हे या घटनेने पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. घनश्याम कापसे यांनी १७ जानेवारी २०१७ ला आर्णी येथील कृषी केंद्रातून महिको कंपनीचे चैतन्य बिजी हे बियाणे खरेदी केले होते. परंतु त्या कपाशी ला बोंडे लागताच पुर्ण सुकाला लागली. दुकानदाराला माहीती दिली पण त्यांनी कंपनीने याची दखलही घेतली नाही. 
 
ऑक्टोबर २०१७ ला तालुका कृषी अधिकारी यांना तक्रार दिली. त्यांनी पाहणी करुन पंचनामा केला त्यात बियाणे दोष असल्याचे स्पष्ट नमुद केले. या अहवालानुसार काहीही कारवाई झाल्याने पुन्हा जिल्हा कृषी अधीक्षक यांना तक्रार दिली त्यांनी पाच सदस्याची जिल्हास्तरीय तपासणी कमिटीने तयार करुन पिक पाहणी अहवाल दिला.
 
दरम्यान या समितीमध्ये जिल्हा अधीक्षक यांचा प्रतिनिधी विभागीय कृषी संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक कृषी विकास अधिकारी जि. प. तालुका कृषी अधिकारी यांनी दि १३ नोव्हेंबर २०१७ ला बियाण्यात दोष असुन शेतकऱ्याचे ९० टक्के नुकसान झाल्याचा स्पष्ट अहवाल दिला आहे. असे असतांनाही अद्यापही शेतकऱ्याला न्याय मिळालेला नाही. वारंवार प्रशासनाचे लोकप्रतिनिधींचे उंबरठे झिझवुनही शेतकऱ्याला न्याया करिता झटावे लागते ही शोकांतिका आहे. शेतकऱ्यांच्या भरवशावर रग्गड बनलेल्या काही कंपन्या काही कृषी माल विक्रेते शेतकऱ्यांचे लुटारू बनू पाहात आहेत असल्याचे चित्र या घटने वरून स्पष्ट होते. 
 
ग्राहक न्यायालयात जा; पोलिसांनी दिला सल्ला 
शेतकऱ्याने समितीचा पिक पाहणी अहवाल जोडुन कृषी केंद्राचे संचालक, बियाणे कंपनीविरुद्ध आर्णी ठाण्यात बोगस बियाणे देऊन फसवणूक केल्या प्रकरणी तक्रार दिली असताना पोलिसांनी ग्राहक न्यायालयात जाण्याचा सल्ला दिला. शेतकऱ्याची फसवणुक झाल्याचे सिद्ध झाले असताना पोलिसांनी गुन्हे दाखल का केले नाही असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे. 
 
आमदार कडूंकडे केली न्याय देण्याची मागणी 
आर्णीत आक्रोश सभेला आलेले शेतकऱ्यांकरिता आंदोलन करणारे आमदार बच्चू कडू यांना घनश्याम कापसे यांनी बोगस बियाणे देवून फसवणूक झाल्याने कारवाई व्हावी, अशी मागणी करत निवेदन दिले. मागील दोन वर्षापासुन फसवणूक झाल्याचे सिद्ध होऊनही न्यायाकरिता शेतकरी झगडतो आहे. खरच या देशात शेतकऱ्याला न्याय मिळणार कि नाही? हा प्रश्न शेतकरी उपस्थित करत आहे. 

 
बातम्या आणखी आहेत...