आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टाकाऊ वस्तूंपासून एसओएसमध्ये थ्रीडी इमारतीचे निर्मिती, लिम्का बुक आॅफ रेकाॅर्डमध्ये होणार नोंद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- स्कूल आॅफ स्काॅलर्स (एसओएस) येथे सोमवारपासून टाकाऊ वस्तुंपासून थ्रीडी इमारत बनवण्यास विद्यार्थ्यांनी सुरुवात केली आहे. हे निर्माण कार्य १० मार्च रोजी पूर्ण होईल. लिम्का बुक आॅफ रेकाॅर्डमध्ये नोंदणी व्हावी, या उद्देशाने थ्रीडी इलुस्ट्रेशन आॅफ आर्किटेक्चरल बिल्डिंग या विषयावर शाळेतील कला विभागातर्फे प्रतिकृती तयार करण्याचा निश्चय करण्यात आला. यासोबतच विद्यार्थ्यांद्वारे तयार करण्यात आलेल्या सुबक कलाकृतींचेही प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. 
 
स्तर संतुलनाची संकल्पना स्पष्ट करणे हाच या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. थ्रीडी इमारत तयार करण्यासाठी फेव्हिकाॅल, निरुपयोगी पृष्ठाचे डबे, दोरी, रंग यांचा उपयोग केला जाणार आहे. प्रतिकृतीचा आकार गुणीले १३ फूट असणार आहे. या उपक्रमासाठी गठीत करण्यात आलेल्या समितीत कला विभागप्रमुख कुणाल राजनेकर, कलाशिक्षक रुपेश भेले, रिना रोहनकर, अजय सोळंके, कृष्णा कलंत्री, ऋचा बंदे, अभिषेक बमनोटे, मृणाल चतुर, प्रिशा चौधरी, यश ठाकरे, सुनय पुनसे, प्रणव वानखडे परिश्रम घेत आहेत.
 
एसओएसतर्फे ‘पेपर पल्प गणेशा’ या विषयावर लिम्का बुक आॅफ रेकाॅर्डसाठी कार्य झाले होते. कागदाच्या लगद्यापासून निर्मित सुमारे ३० फुटाच्या गणेशाला इंडिया बुक आॅफ रेकाॅर्ड प्राप्त झाला आहे. थ्रीडी इमारत उपक्रमाचे उदघाटन सोमवारी सकाळी वाजता महिला कला वाणिज्य महाविद्यालय, चांदूर रेल्वेच्या प्राचार्या डाॅ. वंदना भोयर, प्राचार्य राजश्री शाहू विज्ञान महाविद्यालय चांदूर रेल्वे डाॅ. सुरेशचंद्र ठाकरे, विदर्भ कला संघाचे अध्यक्ष विनोद इंगोले, डाॅ.बाबासाहेब आंबेडकर विद्यालय, अमरावती येथील आशिष देशमुख, शाळेचे प्राचार्य सुरेश लकडे, उपप्राचार्या समीधा नाहर, प्रशासकीय अधिकारी नीलय वासाडे, क्रीडा विभाग प्रमुख नीरज डाफ, तिडके, गणेश विश्वकर्मा तसेच शाळा प्रशासन, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. 
 
सातत्याने नवीन उपक्रम राबवण्याचा प्रयत्न 
स्कूल आॅफ स्काॅलर्सतर्फे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत सातत्याने नवनवीन उपक्रम राबवण्याचा प्रयत्न सुरू असतो. विशेष बाब अशी की, टाकाऊपासून टिकाऊ वस्तुंची निर्मिती करण्याचे काम विद्यार्थ्यांच्या पुढाकाराने सतत सुरू असते. अशाच काही देखण्या वस्तुंचे प्रदर्शनही येथे पालकांसोबतच कलेची आवड असलेल्यांसाठी आयोजित करण्यात आले आहे. 
बातम्या आणखी आहेत...