आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मालगाडीचे तीन डबे रुळावरून घसरले, सुदैवाने अपघात टळला, धामणगाव येथील घटना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धामणगाव येथे रेल्वे रुळावरून घसरलेले डब्बे. - Divya Marathi
धामणगाव येथे रेल्वे रुळावरून घसरलेले डब्बे.
धामणगाव रेल्वे - गुरुवारीरात्री मालगाडीचे तीन डबे रेल्वे रुळावरून घसरल्याने काही काळ रेल्वे वाहतुकीची घडी विस्कटली होती. रेल्वे फाटकाजवळच पसारी धर्मशाळा दालमिललगत हा अपघात घडल्याने रेल्वे फाटकासमोरच गाडी उभी असल्याने शहरातील वाहतूक ठप्प झाली होती. कर्मचाऱ्यांच्या चुकीमुळे हा अपघात घडल्याची माहिती रेल्वे प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. 
 
गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास तांदूळ घेऊन आलेली गाडी मालधक्क्यावर खाली केल्यानंतर तिला शेटींगद्वारे मुख्य ट्रॅकवर आणत असताना इंजिनलगतचे तीन डबे रूळावरून खाली उतरले. मात्र सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. घटनेची माहिती स्टेशन उपप्रबंधक एम. एच. सवई यांनी नागपूर येथील विभागीय कार्यालयाला दिली. या घटनेमुळ अप डाऊन ट्रॅकवरील वाहतूक काळी काळासाठी थांबवण्यात आली होती. गेटलगत घडलेल्या या घटनमुळे काही काळ रेल्वे फाटक बंद असल्याने शहरातील वाहतुकीचीही समस्या निर्माण झाली होती. नंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली. 

 
बातम्या आणखी आहेत...