आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन किलो सोने चोरणाऱ्या तिघांना टोळी विरोधी पथकाने केले जेरबंद, अन्य चोरट्यांचा शोध सुरु

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यवतमाळ - बसस्थानकावरुन मुंबई येथील एका व्यापाऱ्याच्या बॅगेतील तीन किलो तीनशे ग्रॅम सोने लंपास करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात तब्बल तीन महिन्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या टोळी विरोधी पथकाला यश आले आहे. या टोळीतील आरोपींना सोलापूर जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे. त्याशिवाय त्यांच्या अन्य सहकाऱ्यांचा शोध सुरू आहे.
मुंबई येथील घाटकोपर वेस्ट येथे राहणारे विकास शांतीलाल धाकड वय २४ वर्षे या व्यापाऱ्याजवळ असलेले किलो ३०० ग्रॅम सोने यवतमाळ बसस्थानकातून अज्ञात चोरट्याने लंपास केले होते. सप्टेंबर रोजी सकाळी वाजताच्या सुमारास घडलेल्या या घटनेने पोलिसांचीही भंबेरी उडाली होती. या प्रकरणात वडगाव रोड पोलिसांनी अनोळखी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. दरम्यान या गंभीर प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडे सोपविण्यात आला होता. या प्रकरणाच्या तपासादरम्यान हाती आलेल्या माहितीत हे आरोपी सोलापूर जिल्ह्यातील असल्याचे निदर्शनात आले होते. त्यावरुन स्थानिक गुन्हे शाखेच्या टोळी विरोधी पथकाने सोलापूर गाठुन सापळा रचला. त्यात दोन दिवसांच्या अथक परिश्रमानंतर सोने लंपास करणाऱ्या टोळीतील तीन आरोपींना सोलापूर जिल्ह्यातून वेगवेगळ्या ठिकाणावरून अटक करण्यात आली. त्यात अर्जुन शेटीबा डीकोळे, वय ५० वर्षे, हिरामण सर्जेराव डीकोळे वय ३९ वर्षे दोघेही रा. वडशींगी, ता. म्हाडा, जिल्हा सोलापूर आणि रमेश भगवान गुंजाळ वय ३० वर्षे रा. बारलोणी, ता. म्हाडा, जिल्हा सोलापूर यांचा समावेश आहे. मुंबई येथील विकास धाकड यांचे ज्वेलरीचे दुकान असून सोने, हिरे जवारतचे ते होलसेल विक्रेते आहे. धाकड यांचे ग्राहक महाराष्ट्र आणि तेलंगणा येथे असल्याने ग्राहकांच्या मागणीप्रमाणे ते ग्राहकापर्यंत जावून सोन्याच्या मालाची विक्री करतात. सप्टेंबरला विकास धाकड आपल्या दुकानातील एजंट विमल जैन याच्या सोबत सोन्याचा व्यापार करण्यासाठी अदिलाबाद येथे चार हजार ६१६. ४८० ग्रॅम सोन्याचे दागिने घेवून गेले. त्यानंतर सप्टेंबरला अदिलाबादला पोहचल्यानंतर, तेथील काही ग्राहकांना सोन्याच्या दागिन्यांची विक्री केली. त्यानंतर अदिलाबाद येथून बसने यवतमाळ येथे आले. सायंकाळी यवतमाळात आल्यानंतर धाकड यांनी महालक्ष्मी ज्वेलर्स, शिवम ज्वेलर्स, बोरा ज्वेलर्स, कैपील्यवार ज्वेलर्स या ठिकाणी ग्राहकांच्या भेटी घेवून सोन्याच्या दागिन्यांची विक्री केली सोन्याचा कच्चा माल घेवून मुक्कामासाठी लॉजवर गेले. शुक्रवारी सप्टेंबरला व्यापार करण्यासाठी वाशीम जिल्ह्यातील कारंजा येथे जाण्याकरता यवतमाळ बसस्थानकावर आले. त्यावेळी धाकड याच्या दुकानातील एजंट विमल जैन यांच्या जवळ एक बॅग होती. ज्यामध्ये तीन किलो तीनशे ग्रॅम सोन्याचे दागिने होते. धाकड आणि जैन सकाळी वाजता बसस्थानकावर कारंजा जाणाऱ्या बसची वाट पाहत होते. दरम्यान प्लॅटफॉर्म तीनवर यवतमाळ-जालना बस क्रं. एमएच-४०-एन-९१४० आल्याने ते दोघेही बसमध्ये चढण्यासाठी गेले. त्यावेळी बसमध्ये चढणाऱ्याची चांगलीच गर्दी झाली होती. या गर्दीचाच फायदा घेवून अज्ञात चोरट्याने धाकड यांच्या बॅगेला चिरा मारून त्यामधील तीन हजार तीनशे ग्रॅम सोन्याचे दागिने किंमत अंदाजे ८० लाख रूपये लंपास केले होते. या प्रकरणाच्या तपासात टोळीतील सदस्य पोलिसांच्या हाती आले असले तरी आनखी बरेच आरोपी फरार आहेत. त्यामुळे पोलिसांना चोरी केलेल्या सोन्यापैकी कुठलाच मुद्देमाल अद्याप हस्तगत करण्यात यश आलेले नाही. दरम्यान या तीनही आरोपींना सोमवारी दुपारी येथील न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी न्यायालयाने त्यांची चौकशी करण्यासाठी त्यांना २२ डिसेंबर पर्यंत ११ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या दरम्यान त्यांच्याकडुन इतर आरोपींची माहिती घेणे आणि चोरीतील मुद्देमाल हस्तगत करण्याची जबाबदारी पोलिसांवर आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक अखीलेश कुमार सिंह आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजय देशमुख यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रशांत गिते, पोलिस उपनिरीक्षक संतोष मनवर, जमादार ऋषी ठाकुर, संजय दुबे, गजानन धात्रक, किरण पडघण, अमोल चौधरी, बंडु मेश्राम, विनोद राठोड यांच्या पथकाने पार पाडली.

आंतरराज्यीय टोळी असल्याचा पोलिसांना आहे संशय
यवतमाळ येथे चोरी करण्यासाठी या चोरट्यांची टोळी वाहनाने यवतमाळात दाखल झाली होती. त्यानंतर त्यांनी पुर्वीपासून असलेल्या माहितीवरून सोन्याच्या व्यापाऱ्यावर नजर ठेवली होती. चोरट्यांची काम करण्याची ही पद्धत पाहता ही टोळी अट्टल असून, त्यांनी अशाच प्रकारच्या चोऱ्या राज्यासह परराज्यात केल्या असल्याचा संशय पोलिसांना असुन त्याचीही चौकशी करण्यात येत आहे.

सीसीटीव्ही फुटेज ठरले महत्वाचे
चोरीच्या तपासासाठी पोलिसांच्या हाती सीसीटीव्ही फुटेज हा एक धागा होता. याच धाग्याला पकडून पोलिसांनी तपासाला सुरूवात केली. त्यात हे सीसीटीव्ही फुटेज उपयोगी ठरून त्यात आढळुन आलेले तीनही आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. आता सीसीटीव्हीत नसलेल्या मात्र या गुन्ह्यात सहभाग असलेल्या आरोपींचा शोध सुरू आहे.

उर्वरीत आरोपींचा अद्याप शोध सुरू
या प्रकरणाचा तपास सुरू होताच पोलिसांच्या हाती आलेले सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेज मध्ये आरोपी कैद झाले होते. त्यांच्या राहणीमानावरुन ते जिल्ह्यातील नसल्याचे स्पष्ट झाले होते. त्यांचा शोध घेतला असता ही टोळी सोलापुरातील असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यातच या टोळीत असलेल्या आनखी ते आरोपींचा शोध सुरू करण्यात आला आहे.

वेश बदलून आरोपींचा शोध
सोन्याची चोरी करणाऱ्या आरोपींचा पत्ता काढण्यासाठी पोलिस पथके महिन्यापासून प्रयत्न करीत होती. त्यात हे आरोपी सोलापूर येथील असल्याचे माहिती होताच पोलिस पथक त्या ठिकाणी दाखल झाले. मात्र तेथे आरोपींचा शोध घेण्यासाठी त्यांना वेश बदलुन एका खासगी वाहनाने फिरावे लागले. त्याचा फायदा होवुन आरोपी त्यांच्या हाती आले.
बातम्या आणखी आहेत...