आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास आता दहापट दंड, स्टंटबाजीसाठी आता किमान हजार रुपये दंड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- वाहनचालवताना अनेक वाहन चालकांकडून नियमांचे उल्लंघन केले जाते. त्यावेळी वाहतूक पोलिसांकडून वाहन चालकांना दंड दिला जातो. आतापर्यंत वाहतुकीचे नियम पायाखाली तुडविणाऱ्यांना बहुतांश कलमान्वये १०० रुपये इतकाच दंड आकारता येत होता. त्यामुळे हा दंड फारसा प्रभावी ठरत नव्हता. मात्र नव्या नियमानुसार आता वाहतूक दंडामध्ये वाढ झाली असून किमान २०० रुपये दंड झाला अाहे. तसेच रॅश ड्रायव्हिंग आणि स्टंटबाजी करणाऱ्यांना तर किमान हजार रुपये दंडाची तरतूद केलेली आहे. या वाढीव दंडानुसार लवकरच शहरात कारवाई होणार आहे.

सद्या वाहतूक पोलिस नियम तुडवणाऱ्या वाहनचालकांना जो दंड आकारतात, ती रक्कम कमी आहे. या रकमेमुळे तर काही वाहनचालकांनी १०० रुपयेच दंड लागतो, ती रक्कम काही जास्त नाही, दंड भरून टाकू अशी मानसिकता बनवलेली आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन करा आणि १०० रुपये भरा, अशी काहीशी परिस्थिती झाली आहे. त्यामुळे कारवाई करणारे वाहतूक पोलिसही कधी कधी हतबल झालेले पाहायला मिळतात. यापुढे मात्र वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास दंड अधिक प्रमाणात आकारल्या जाणार आहे. या संदर्भात वरिष्ठ स्तरावर काही दिवसांपूर्वीच निर्णय झालेला आहे. अद्याप त्या संदर्भात अंमलबजावणी झालेली नाही. मात्र राज्यातील काही शहरांमध्ये नवीन दंड आकारणीचे दर अंमलात आणण्यासंदर्भात प्रक्रिया सुरू झालेली आहे. आयुक्तालयातही या संदर्भात लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे. या अंमलबजावणीनंतर मात्र वाहतूक दंडाची रक्कम फुगणार आहे. वाहतुकीला शिस्त लागण्यासाठी हा दंड प्रभावी ठरणार किंवा नाही, हे महत्त्वाचे ठरणार आहे.

लवकरच अंमलबजावणी
वाहतूकनियमांचेउल्लंघन करणाऱ्या वाहन चालकाविरुद्ध सुधारीत दंडानुसार आगामी काळात कारवाई करण्यात येणार आहे. सुधारीत दरांच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक प्रक्रीया सुरू झालेली आहे. लवकरच शहरात नविन दरांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. मोरेश्वरआत्राम, पोलिस उपायुक्त.

दंडाच्या सुधारितरकमेबाबत शुक्रवारी (दि. १९) बैठक झाली आहे. या बैठकीत अंमलबजावणी करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली आहे. २२ ऑगस्टला हा प्रस्ताव पोलिस आयुक्तांसमोर मांडण्यात येणार आहे. पंजाबरावडोंगरदिवे, एसीपी, वाहतूक शाखा.
पुढील स्लाइड्सवर वाचा, कसे असतील दंड...
बातम्या आणखी आहेत...