आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसांच्याच अंगावर ट्रक चढवण्याचा प्रयत्न, ट्रकखाली दबून 10 गुरे दगावली, 7 जणांविरुद्ध गुन्हे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पोलिसांना चकमा देताना उलटलेला जनावरांचा हाच तो ट्रक. - Divya Marathi
पोलिसांना चकमा देताना उलटलेला जनावरांचा हाच तो ट्रक.
अमरावती/ धामणगाव रेल्वे  - अंजन सिंगीते कुऱ्हा मार्गावरुन जाणाऱ्या एका ट्रकमध्ये गुरांची वाहतूक केली जात असल्याची शंका रात्रगस्तीवर असलेल्या एलसीबीच्या पोलिसांना आली. त्यामुळे पोलिसांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला तर चालकाने ट्रक पोलिसांच्या अंगावर चढवण्याचा प्रयत्न केला. तसेच पोलिस कारवाईपासून वाचण्यासाठी ट्रकचालकाने धावत्या ट्रकमधून स्वत: उडी घेतली. त्यामुळे ट्रक उलटला. यावेळी ट्रकखाली दबल्याने दहा गुरांचा मृत्यू झाला तर तीन गुरांना गंभीर दुखापत झाली. याचवेळी पोलिसांनी सोळा गुरांची सुखरूप सुटका केली. ही घटना अंजनसिंगी ते कुऱ्हा मार्गावर गुरूवारी (दि. १०) पहाटे घडली. 
 
तिवसा ते चांदूर रेल्वे रस्त्याने एका ट्रकमध्ये गुरांची वाहतूक सुरू असल्याची शंका आल्यामुळे एलसीबीच्या पथकाने ट्रक थंाबवून त्यामध्ये काय आहे, याबाबत विचारणा केली. त्यावेळी ट्रक चालकाने पोलिस मागे असतानाच ट्रक ‘रिव्हर्स’ घेवून पोलिसांच्या अंगावर चढवण्याचा प्रयत्न केला. यावेळी ट्रकचालक ट्रक घेवून पसार झाला. दरम्यान पेालिसांनीही त्याचा पाठलाग सुरू केला. जवळपास एक तासाच्या पाठलागानंतर अशोकनगरजवळ ट्रकचालकाने धावत्या ट्रकमधून उडी घेतली. त्यामुळे ट्रक रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी झाला. यामध्ये दहा गुरे दबून मृत्यूमुखी पडली, तर तीन गुरे गंभीर जखमी झाले. दरम्यान ही माहीती पोलिसांना मिळताच परिसरातील पोलिस ठाण्याचे तसेच अतिरीक्त पोलिस कुमक बोलवण्यात आली होती. 
 
या प्रकरणी एलसीबीचे एपीआय नरेन्द्र ठाकरे यांच्या तक्रारीवरून कुऱ्हा पेालिस ठाण्यात ट्रक चालक अलताफ खान ऊर्फ राजा रशीद खानद (२२, रा. नागपूर) आणि मुक्तार बेग मुस्ताक बेग (२८, रा. कामठी, नागपूर) यांच्यासह सात जणांविरुध्द पोलिसांवर जीवघेणा हल्ला चढवणे, शासकीय कामात अडथळा निर्माण करणे तसेच प्राण्यांची निर्दयीपणे वाहतूक करणे अन्य कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान पोलिसांनी अलताफ खान मुक्तार बेग या दोघांना अटक केली आहे, अशी माहिती कुऱ्हा पोलिसांनी दिली आहे. 
बातम्या आणखी आहेत...