आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुरीला किमान 4400 रुपये भाव, बाजार समित्यांमध्ये नव्या तुरीची आवक झाली सुरु

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत नवीत तुरीची आवक सुरू झाली असून तुरीला किमान ४४०० तर कमाल ५०५० रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे. दरम्यान, हरभऱ्याच्या दरात घसरण झाली असून हरभऱ्याला किमान ६५०० तर कमाल ७००० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. 
 
जिल्ह्यातील हलक्या जमीनीतील तुरीचा हंगाम सुरू झाला असून बाजारात नवीन तुरीची आवक सुरू झाली आहे. चालू वर्षात केंद्र शासनाने तुरीला ५०५० रुपये हमीभाव घोषित केला आहे. परंतु मागील महिनाभरापासून तुरीचे दर कमालीचे घसरून बाजारात जुन्या तुरीची हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी सुरू आहे. जिल्ह्यात तुरीचे क्षेत्र वाढले असून पीक समाधानकारक असल्याचे दिसत असतानाच दर घसरल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. दरम्यान, आज बाजारात नवीन तुरीची आवक झाली असून तुरीला सरासरी किमान ४४०० तर कमाल ५०५० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. हरभऱ्याच्या दरातही घसरण झाली सुरू झाली असून पाच दिवसात हरभऱ्याच्या दरात पाचशे ते सोळाशे रुपये दराने भावात घट झाली आहे. ३१ डिसेंबरला हरभऱ्याला किमान ७२५० तर कमाल ८६०० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला होता. बाजारात आज ११ हरभऱ्याच्या पोत्यांची आवक झाली. बाजारात सोयाबीनचे भाव स्थिर असून आज सोयाबीनला किमान २७५० तर कमाल २८०२ रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. बाजारात सोयाबीनच्या ९६३२ पोत्यांची आवक झाली. 

कापसाचीआवक घटली: येथीलकापसाच्या खासगी बाजारात होणारी सरासरी दोन ते अडीच हजार क्विंटल कापसाची आवक घटली. बाजारात आज केवळ १९४१ क्विंटल कापसाची आवक झाली. 
बातम्या आणखी आहेत...