आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थरार: दोन मद्यपींनी पोलिसासह युवकाला चाकूने भोसकले, महिलेशीही केले अश्लील चाळे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पतीच्या गळ्याला चाकू; पत्नीसोबत अश्लील चाळे - Divya Marathi
पतीच्या गळ्याला चाकू; पत्नीसोबत अश्लील चाळे
अमरावती - दोन मद्यपींनी विधवा महिलेच्या घरी जाऊन दाराला जोरजोराने लाथा मारल्यानंतर मदतीसाठी आलेल्या पुतण्याला चाकूने भोसकले तर दुसऱ्या अन्य महिलेच्या पतीच्या गळ्याला चाकू लावून महिलेशी अश्लील चाळे केले. त्यानंतर याचठिकाणी गस्तीवर असलेल्या पोलिसालाही मद्यपीने चाकू मारुन जखमी केल्याची थरारक घटना मंगळवारी (दि. २५) पहाटे साडेतीन ते चार वाजताच्या सुमारास महादेवखोरी परिसरात घडली.
 
दरम्यान, या घटनेतील तरुण गंभीर जखमी असून, त्याला उपचारासाठी नागपूर येथे हलविण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी दीपक विठ्ठल आसटकर ( ४०) रा. महादेव खोरी रुपचंद फुलचंद बमनेल (वय ३५), रा. मसानगंज यांना अटक केली आहे. या घटनेमुळे महादेव खोरी परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले. दीपक विठ्ठल आसटकर (४० रा. महादेव खोरी) आणि रुपचंद फुलचंद बमनेल (३५, रा. मसानगंज) असे हल्लेखोरांची नावे आहेत. महादेव खोरी भागात राहणाऱ्या बाली तायडे (वय ३५) यांच्या घरी जाऊन दीपक आसटकर रुपचंद बमनेल यांनी पहाटेच्या सुमारास घराच्या दारावर जोराने लाथा मारण्यास सुरवात केली. त्यामुळे बाली यांनी तातडीने त्याच भागात राहणारा त्यांचा पुतण्या सूरज नाना तायडे (वय २०) याला आणि एका महिलेला मोबाईलवरून फोन करून मदतीसाठी बोलावले. त्यामुळे सूरज तातडीने बाली यांच्या घरासमोर आला असता दीपक रुपचंद या दोघांनी चाकूने सूरजच्या पोटावर वार केले. त्यानंतर परिसरातच राहणारी महिलासुध्दा मदतीसाठी आली. त्यावेळी रुपचंद दीपक यांनी महिलेचा पाठलाग करून तिच्या घरात प्रवेश केला. यावेळी त्या महिलेचा पती घरात होता. पती पत्नीच्या बचावासाठी येताच त्याच्या गळ्याला चाकू लावून त्यांना एका जागेवर बसवून ठेवले. तसेच अन्य एकाने महिलेच्या मागे जाऊन तिच्यासोबत अश्लील चाळे केले. तत्पुर्वी या प्रकरणाची माहिती बाली तायडे यांनी पोलिसांना दिली होती. त्यामुळे गस्तीवर असणारे पोलिस महादेव खोरी भागात पोहचले. त्यावेळी हा थरार सुरूच होता. त्यामुळे पोलिस शिपाई नितेश पवार यांनी या हल्लेखोरांना पकडण्याचा प्रयत्न केला असता दोघांनीही पवार यांच्यावरही चाकुने हल्ला चढवला. घटनेचे गांभिर्य लक्षात घेता अतिरीक्त पोलिस कुमक मागवण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले. घटनेची माहिती मिळताच रात्रगस्तीवर असलेले एसीपी मिलिंद पाटील तसेच पोलिस निरीक्षक दिलीप पाटील हे सुध्दा घटनास्थळी पोहचले. 
 
पोलिसांनी या दोन्ही हल्लेखोरांना ताब्यात घेऊन फ्रेजरपुरा ठाण्यात आणले. दरम्यान फ्रेजरपुराचे ठाणेदार पंजाबराव वंजारीसुध्दा तातडीने घटनास्थळी पोहचले. दुसरीकडे हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सूरजला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणात महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी प्राणघातक हल्ला, विनयभंग, जबरीने घरात प्रवेश करणे, शासकीय कर्मचाऱ्यावर हल्ला, धमकी देणे आदी कलमान्वये गुन्हे नोंद केले आहे. या घटनेने परिसरात चांगलीच दहशत पसरली आहे. पोलिसांनी या दोन्ही हल्लेखोरांना पहाटे अटक केली आहे. आरोपींनी पोलिसावरही चाकू हल्ला केल्याने पोलिसांचा वचक कमी झाल्याचे बोलले जात आहे. 
 
दोघांना केली अटक 
- महादेव खोरी परिसरात अटक केलेल्या दोन्ही मद्यपींनी एका युवकासह पाोलिसाला चाकू मारला आहे. युवक गंभीर जखमी झाला आहे. त्या दोघांना आम्ही अटक केली आहे. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.
पंजाबराव वंजारी, ठाणेदार फ्रेजरपुरा. 
 
पुढील स्लाइडवर वाचा, जखमी सूरजला नागपूरला हलवले... 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...