आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावती: भुयारी गटारच्या खोदकामावर सभेमध्ये नगरसेवक संतापले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मनपाच्या भुयारी गटार योजनेसाठी असे रस्ते खोदले जात आहेत. - Divya Marathi
मनपाच्या भुयारी गटार योजनेसाठी असे रस्ते खोदले जात आहेत.
अमरावती - शहरातील गुळगुळीत रस्त्यांवर भुयारी गटार योजनेचे काम करून रस्त्यांची ‘वाट’ लावली जात असल्यामुळे सत्ताधारी भाजपसह सर्वच पक्षाच्या नगरसेवकांनी मनपा सर्वसाधारण सभेत मंगळवारी १८ एप्रिलला नाराजी व्यक्त केली. त्यामुळे महापालिका महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने समन्वयाने कार्य करण्याचे आवाहन नगरसेवकांनी केले. 
 
महापालिका क्षेत्रात मागील १५ ते २० वर्षांपासून भुयारी गटार योजनेचे कार्य सुरू आहे. मध्यंतरी निधी नसल्याने बंद असलेले योजनेचे कार्य पाच ते सहा वर्षांपासून पुन्हा सुरू केले. केंद्र,राज्य शासनाकडून निधी मिळत असल्याने जीवन प्राधिकरण विभागामार्फत या योजनेच्या कार्याने गती पकडली. लोकसभा, विधानसभा, मनपाच्या निवडणुकीचा धुमधडाका असल्याने दोन- तीन वर्षात शहरात रस्ते विकासाचा महापूर आल्याचे चित्र होते. रस्ते विकासाचे नियोजन केले, त्यातील काही रस्त्यांचे भाग्य उजळले देखील. कोट्यवधी रुपये खर्च करीत गुळगुळीत झालेल्या रस्त्याचे भुयारी योजनेच्या कार्यासाठी खोदकाम होत असल्याचे चित्र शहरात दिसून येत आहे.
 
अनेक वर्षांच्या मागणीनंतर दुरुस्ती केलेल्या रस्त्यांची खोदकामाने पुन्हा एैसी तैसी होत असल्याने नगरसेवकांचा पारा आम सभेत चांगलाच चढला. प्रशासनाकडून आलेल्या अमरावती भुयारी गटार योजना लालखडी येथील ३०.५० दलघमी क्षमतेचे मलशुद्धी करण केंद्र हस्तांतरित करण्याबाबत विषय सादर केला होता. यावर सभागृहातील चर्चेत माजी महापौर विलास इंगोले, चेतन पवार, प्रकाश बनसोड, तुषार भारतीय, अजय गोंडाणे, प्रशांत वानखडे, चेतन गावंडे यांच्यासह अन्य नगरसेवकांनी सहभाग घेतला होता. सेवानिवृत्त अभियंता यांची कंत्राटी पद्धतीने मनपात नियुक्तीच्या विषयास मंजूरी दिली. राजापेठ रेल्वे उड्डाणपुलाच्या प्रकल्प अहवाल;राज्य नगरोत्थान’ योजनेच समाविष्ट करण्यास मंजूरी दिली. बडनेरातील सावित्रीबाई फुले सूतिकागृह सुरू करण्याबाबत मान्यता देण्यात आली. 
 
मनपा कर्मचाऱ्यांना वैद्यकीय प्रतिपूर्ती 
मनपात कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांना वैद्यकीय प्रतिपूर्तीचा लाभ मिळणार आहे. मनपा सभेत प्रशासनाच्या विषयास मान्यता दिली. सभेची मान्यता मिळाल्याने मनपातील १५०० पेक्षा जास्त अधिकारी-कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. उपायुक्त नरेंद्र वानखडे यांनी प्रयत्न करीत या विषयाला वाचा फोडल्याने कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. 
शहराला स्वच्छ सुंदर करण्याच्या दृष्टिने सर्वसाधारण सभेने एका महत्वपूर्ण विषयाला मंजूरात देण्यात आली. प्लास्टिक कचऱ्यामुळे मनुष्यासह सर्व प्राणी मात्रांचे नुकसान होत असल्याचे वास्तव समोर आले. जनावरे प्लास्टिक खात असल्याने त्यांचे मृत्यू होत असल्याचे दिसून आले आहे. आराेग्य विभागाकडून आलेल्या या विषयाला मंजूरी देण्यात आली आहे. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...