आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अन् कलाच बनली ‘त्या’ युवकाचा जगण्याचा आधार, विद्यार्थ्‍यांनाही देतो प्रशिक्षण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मारेगाव - मनात काही करण्याची जिद्द असली की, यश मिळतेच. प्रतिभेच्या आधाराने तर प्रतेक व्यक्ती आपल्या लक्ष्यापर्यंत पोहोचतो. मात्र, विषम परिस्थितीत जो मिळवतो तोच या यशाचा मानकरी ठरतो. विनोदने स्वत:च्या केलेला जीवंत ठेवण्याचा प्रयत्न केला. काही वेगळे करण्याच्या जिद्दीने आज त्याच्या मेहनत आणि परिश्रमाला रंग येत आहे. संपूर्ण विदर्भात बहु कलाकार म्हणून विनोद आज प्रसिद्ध झाला. 
 
लहानपणापासूनच काही करण्याच्या जिद्दीने त्याला स्वस्थ बसू दिले नाही. घरची हलाखीची परिस्थिती त्याला बेचैन करत होती. शिक्षण, खेळण्या, बागडण्याच्या दिवसात तो मूर्तीला आकार देऊ लागला. एक दोन नाही, तर अनेक गणपती, दुर्गा देवीच्या मूर्त्या बनवू लागला. नकला, ऑर्केस्ट्रा, पेंटिंग, रांगोळी अशा अनेक कलेने तो नावा रूपाने मोठा होऊ लागला. आज बहुरूपी कलाकार म्हणून त्याची विदर्भात ओळख निर्माण झाली आहे. 
 
मारेगाव येथे विनोद आदे याचा जन्म झाला. विनोदचे शिक्षण ही तेवढ्या पुरतेच, वडील लाकडाला आकार द्यायचे आणि विनोद मातीला. लहानपणापासूनच काहीतरी वेगळे करण्याची जिद्द त्याच्या मनात होती. मात्र, घरची परिस्थिती जेमतेम असल्याचे त्याच्या लक्षात यायचे आणि तो शांत बसायचा. त्याचे मन त्याला स्वस्थ बसू देत नव्हते. त्याच्या वडिलांचे स्वप्नही त्याला पूर्ण करायचे होते. वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षांत त्याने मातीला आकार देणे सुरू केले. गणपती, दुर्गा देवीच्या सुंदर मूर्ती तो बनवू लागला. त्याच्या मूर्त्यांची मागणी विदर्भात होऊ लागली. आज विनोद यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे वास्तव्यास आहे. मुर्त्या बनवण्यासह संगीतातही त्याची रूची दिवसागणिक वाढू लागली. संगीत शिकण्याच्या आवडीने त्याच्या मनात घर केले. त्याला वेळ मिळायचा, तेव्हा तो शिकायचा. आता नकला, पेंटिंग, आॅर्केस्ट्रामध्येही सहभागी होतो. अनेक युवकांना त्याने या सर्व कलेचे मोफत प्रशिक्षण देणेही सुरू केले आहे. गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराचा कार्यक्रम तो दरवर्षी घेतो. आता सामाजिक कार्य करणे त्याची आवड बनली आहे. 
 
विविध पुरस्काराने विनोदचा सन्मान 
शेतकरी आत्महत्येवर त्याने निसर्गाची किमया नावाचा लघु चित्रपटही बनवला. विनोदची सह्याद्री सोबतच अनेक टीव्ही चॅनलने प्रशंसा केली. विनोदला मुंबई साहित्य कला पुरस्कार, अध्यापक, अभिनय, नकालाकार पुरस्कार, शाहीर नाविडेकर पुरस्कार, साहित्यकार शेवाळकर पुरस्कार, असे डझनभर पुरस्कार मिळाले आहेत. 
 
बातम्या आणखी आहेत...