आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अतिक्रमित रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास, यवतमाळमध्ये अतिक्रमणावर चालला बुलडोझर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यवतमाळ नगरपालिकेच्या वतीने शहरातील अनधिकृत अतिक्रमण हटवण्यासाठी मंगळवारपासून धडक मोहीम हाती घेण्यात आली. या वेळी तहसील, दत्त चौक, बसस्थानक चौकासह स्थानिक नेताजी चौक परिसरातील अतिक्रमण हटवण्यात आले. - Divya Marathi
यवतमाळ नगरपालिकेच्या वतीने शहरातील अनधिकृत अतिक्रमण हटवण्यासाठी मंगळवारपासून धडक मोहीम हाती घेण्यात आली. या वेळी तहसील, दत्त चौक, बसस्थानक चौकासह स्थानिक नेताजी चौक परिसरातील अतिक्रमण हटवण्यात आले.
यवतमाळ - शासनस्तरावरून मिळालेल्या निर्देशानुसार शहरातील अतिक्रमण काढण्यासाठी नगरपालिकेने मंगळवार, १८ एप्रिलपासून विशेष मोहीम सुरू केली. शहरातील मोक्याच्या ठिकाणी अतिक्रमण झाल्यामुळे रस्ते अरुंद झाले होते. आज काढलेल्या अतिक्रमणामुळे शहरातील काही रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला. 
 
शहरांमध्ये मोक्याच्या शासकीय जमिनींवर अतिक्रमण धारकांनी कब्जा करून ठेवल्याने मोठ्या अडचणी येत आहेत. विशेष म्हणजे शहरातील रस्तेही अतिक्रमणामुळे अरुंद झाले. या प्रकारामुळे वाहनधारकांसह पायी चालणाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. ही बाब पाहता पालिकेच्या हद्दीत येणाऱ्या परिसरातील अतिक्रमण काढून टाकण्यासंदर्भात शासन स्तरावरून वारंवार निर्देश देण्यात येत आहेत. या निर्देशावरून पालिका प्रशासनाने आता अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेला मंगळवारपासून सुरुवात करण्यात आली. तत्पूर्वी, अतिक्रमणधारकांना नगरपालिकेने नोटीस बजावून अतिक्रमण काढण्याबाबत सुचित केले होते. तरीसुद्धा बहुतांश अतिक्रमण काढण्यात आलेच नव्हते. शेवटी आज सकाळी १० वाजतापासून नगरपालिकेने मोठा फौजफाटा घेऊन अतिक्रमण हटाव मोहिमेला सुरुवात केली. सर्वप्रथम शहरातील तहसील कार्यालय, दत्त चौक, बसस्थानक चौक, नेताजी चौक परिसरातील मुख्य रस्त्यांवर करण्यात आलेले अतिक्रमण काढण्यात आले. काही महिन्यांपूर्वी अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली होती. मात्र पुन्हा छोट्यामोठ्या व्यावसायिकांनी अतिक्रमण करून दुकाने थाटली होती. नगरपालिकेने मोहीम सुरू करताच मिळेल त्या वाहनाने अतिक्रमण काढून घेण्यात आले. विशेष म्हणजे बऱ्याच व्यावसायिकांचे मार्केटमध्ये दुकान आहे. परंतु रस्त्यापर्यंत दुकानातील साहित्य लावण्यात येत होते. काहींनी दुकानाच्या नावाचा फ्लेक्स चक्क रस्त्यावर आणला होता. अशा अतिक्रमण धारकांचे फ्लेक्स जेसीबीच्या माध्यमातून काढण्यात आले. या मोहिमेदरम्यान अनधिकृत धार्मिक स्थळे सुद्धा हटवण्यात येणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली होती. काही महिन्यांपूर्वी राबवण्यात आलेल्या मोहिमेत शहरातील १५७ अनधिकृत धार्मिक स्थळांपैकी ३६ धार्मिक स्थळे हटवली आहेत. उर्वरित धार्मिक स्थळे आता हटवण्यात येणार असल्याचेही या वेळी सांगण्यात आले. या विशेष मोहिमेसाठी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त होता. या मोहिमे दरम्यान अनुचित प्रकार घडू नये म्हणून नगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारीसुद्धा उपस्थित आहेत. 
 
व्यापाऱ्यांच्या साहित्याने होते सर्वच बेजार : शहरातीलदत्त चौक परिसरातील व्यापाऱ्यांची दुकाने मार्केटमध्ये आहेत. मात्र या दुकानातील साहित्य चक्क रस्त्यापर्यंत लावले आहे. त्यातही काहींच्या दुकानांचे फ्लेक्स बोर्डही रस्त्यावर होते. अशा परिस्थितीत छोटे-मोठे अपघात दैनंदिन घडत असे. सर्वसामान्य यामुळे बेजार झाले होते. मात्र, आज काढलेल्या अतिक्रमणामुळे स्थानिक दत्त चौकाने मोकळा श्वास घेतल्याची प्रतिक्रिया नागरिकांतून उमटत होत्या. 

अतिक्रमण थेट जमीनदोस्त 
अतिक्रमण काढून घेण्याबाबत पालिकेच्या सूचनेकडे काही व्यावसायिकांनी दुर्लक्ष केले. शेवटी अशा व्यावसायिकांच्या अतिक्रमणावर बुलडोझर चालवण्यात आला. या कारवाईमुळे पालिका प्रशासना विरोधात नाराजी दिसत होती. 

अतिक्रमण हटवताना सहकार्य करावे 
-
व्यावसायिकांना नोटीसबजावल्या होत्या. त्यानंतरही काहींनी अतिक्रमण काढले नव्हते. शहरातील तीन ते चार मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण हटवले. उर्वरित अतिक्रमण काढताना सहकार्य करावे.
सुदामधुपे, मुख्याधिकारी, नगरपालिका. 
 
पुढील स्लाइडवर पाहा, अतिक्रमण हटवण्यात आलेले फोटो...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...