आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षक मतदारसंघातून विक्रम काळेंची विक्रमी विजयाकडे घाेडदौड !

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- विधान परिषदेच्या शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमाेजणी साेमवारी रात्री उशिरापर्यंत सुरू हाेती. मराठवाडा शिक्षक मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान अामदार विक्रम काळे यांची सलग तिसऱ्यांदा विजयाच्या दिशेने दमदार घाेडदौड सुरू होती. अमरावती पदवीधर मतदारसंघातून गृह राज्यमंत्री डाॅ. रणजित पाटील माेठ्या मताधिक्याने विजयी झाले. नाशिक पदवीधर मतदारसंघातील काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार डाॅ. सुधीर तांबे पाचव्या फेरीत ४२ हजार ८२५ मतांची आघाडी घेऊन विजयी झाले, तर काेकण शिक्षक मतदारसंघातूनही राष्ट्रवादी काग्रेस व शेकाप अाघाडीचे उमेदवार बळीराम पाटील  निर्णायक अाघाडीवर हाेते.
 
मराठवाडा शिक्षक मतदारसंघात विक्रम काळे यांना १४ व्या फेरीअखेर २३३५० मिळाली होती. तर त्यांचे प्रतिस्पर्धी सतीश पत्की यांना १२८३४ मते मिळाली होती. विजयासाठी २४,८०८ हा कोटा निश्चित करण्यात आला आहे. १४ व्या फेरीअखेर काळेंना विजयासाठी १४५८ मतांची आवश्यकता होती. प्रथम फेरीत काळेंना पहिल्या पसंतीची २२७२४, भाजपचे सतीश पत्की यांना १२,५११ मते मिळाली, तर व्ही. जी. पवार यांना ६,७६७ मते मिळाली. मात्र या फेरीतील कोटा पूर्ण न झाल्याने पुढील पसंतीक्रमांची मते मोजण्याचे काम सुरू होते. रात्री २.३० वाजता १४ वी फेरी पूर्ण करून १५ व्या फेरीची मतमोजणी हाती घेण्यात आली होती.
 
नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार डॉ. सुधीर तांबे यांना पाचव्या फेरीत ८३ हजार ३११ मते मिळाली. भाजपचे डॉ. प्रशांत पाटील यांच्यावर ४२ हजार ८२५ मतांची आघाडी घेऊन ते विजयी झाले. अमरावती पदवीधरमध्ये  भाजपचे उमेदवार  डॉ. रणजित पाटील यांनी काँग्रेसचे संजय खोडके यांच्यावर एकतर्फी मात करत दणदणीत विजय मिळवला. डॉ. पाटील यांना ४३ हजार ८९७ मतांची अाघाडी मिळाली. कोकण शिक्षक मतदारसंघातून शेकापचे बाळाराम पाटील अाघाडीवर असल्याने त्यांचाही विजय निश्चित मानला जाताे. नागपूर मतदारसंघात फेरमतदान घेण्यात आल्यामुळे तेथील मतमोजणी मंगळवारी होणार आहे.
 
पुढील स्लाइडवर पाहा, जल्लोष करताना कार्यकर्ते...
 
Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...