आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाण्यासाठी शिरजगाव येथील अधिकाऱ्यांना चार तास कोंडले, ठेकेदाराने काम बंद केले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिरजगाव मोझरी ग्रामपंचायतीला गावकऱ्यांनी कुलूप ठोकले. - Divya Marathi
शिरजगाव मोझरी ग्रामपंचायतीला गावकऱ्यांनी कुलूप ठोकले.
तिवसा - रणरणत्याउन्हात गावकऱ्यांना भीषण पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत असल्याने संतप्त झालेल्या शिरजगाव मोझरी येथील गावकऱ्यांनी मंगळवारी (दि. १८) अधिकाऱ्यांना चार तास ग्रामपंचायतीला कुलूप लावून कोंडून ठेवले. दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस पथकाने गावात पोहोचून अधिकाऱ्यांची सुटका केली.
 
या संदर्भात देण्यात आलेल्या माहितीनुसारह तालुक्यातील शिरजगाव मोझरी येथे वॉर्ड क्रमांक चारमध्ये भीषण पाण्याची टंचाई असून पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना भटकावे लागत आहे. दरम्यान गावकऱ्यांच्या तक्रारी नंतरही वॉर्ड क्रमांक चार मधील पाणी समस्या सुटल्यामुळे आज विस्तार अधिकारी सुधाकर उमक, शाखा अभियंता एम.बि.दामोधरे ग्रामपंचायत सचिव विनोद कांबळे येथील ग्रामपंचायतीत पोहचले. यावेळी ग्रामपंचायत शिपाई पंडितराव ढोबळेही उपस्थित होते. 
 
दरम्यान संतप्त झालेल्या नागरिकांनी ग्रामपंचायतीत धाव घेऊन कार्यालयाला कुलुप ठोकले. दरम्यान, ग्रामपंचायतीचे सचिव कांबळे यांनी या घटनेची माहिती तिवसा पोलिस स्टेशनला दिल्यानंतर ठाणेदार जी. एस. शिंदे यांनी गावात धाव घेऊन सुमारे चार तासाने कुलुप उघडुन अधिकाऱ्यांची सुटका केली. पाणीटंचाईमुळे त्रस्त झालेल्या गावकऱ्यांनी तेरा दिवसांपुर्वी ग्रामपंचायतला घेराव घालून पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली होती. यावर काहीच झाल्याने अखेर आज नागरिकांनी अधिकाऱ्यांना कोंडून ठेवण्याचा आक्रमक पवित्रा घेतला होता. घटनास्थळी वेळेवर पोलिस पोहोचल्याने तणाव निवडला, 
 
ठेकेदाराने काम बंद केले 
गावातील एका व्यक्तीने ठेकेदाराला काम मागितले. म्हणून त्यांनी काम बंद केले. मी आज गावात नव्हते,अशी माहिती शिरजगाव मोझरीच्या सरपंच कविता हिवराळे यांनी सांगितले. 
 
तांत्रिक बिघाडामुळे काम रखडले 
- त्या गावातील लोकांकडे तीन लाखांचा कर थकीत आहे. तरी ८० हजारांची तरतुद यासाठी केली. जि. प.चे अभियंते बोलावून एस्टिमेट तयार केले .जेथे पाईप टाकायांचा आहे तिथे रोड फोडावा लागतो. कंत्राटदार अर्धवट काम करत आहे.
सुधाकरउमक, विस्तार अधिकारी तिवसा पंचायत समिती 
 
कंत्राटदारामुळे आहे अडचण 
- काही जणांना पाणी मिळत नसल्यामुळे लवकरच नवीन पाईपलाईन टाकण्यात येईल. नागरिकांसाठी पाणी पुरवठा सुरळीत करण्याचा आमचा प्रयत्न आहे. कंत्राटदार हे काम करण्यासाठी येत नसल्यामुळे ही अडचण निर्माण झाली आहे.
विनोदकांबळे, सचिव, ग्रा.प. शिरजगाव मोझरी 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...