आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजपासून अमरावती शहरात नळाला नियमित पाणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातर्फे (मजीप्रा) शहराला सिंभोरा येथून पाणीपुरवठा करणाऱ्या १५०० एमएम पाईपलाईनच्या दुरुस्तीचे काम मंगळवार ते गुरुवार मार्च या कालावधीत करण्यात आले. परिणामी तीन दिवस पाणीपुरवठा ठप्प राहिला. परंतु, दुरुस्तीचे काम पूर्ण झाले असून सिंभोरा येथील २५० अश्वशक्तीचे चारही पंप सायंकाळपर्यंत सुरू करण्यात आले. त्यामुळे शहरातील काही भागात शुक्रवारी (१० मार्च) रात्री वाजतानंतर पाणी पुरवठा सुरू झाला. परंतु, पाण्याचा दाब (फोर्स) कमी होता. शनिवारपासून शहरात नियमित पाणीपुरवठा सुरू होईल,अशी माहिती मजीप्राचे अधीक्षक अभियंता प्रशांत भामरे यांनी दिली. 
 
तीन दिवस पाणी पुरवठा बंद राहिला यासाठी पंचतारांकीत औद्योगिक वसाहतीत असलेल्या रतन इंडिया प्रा. ली. (सोफिया) कंपनीने मधूनच काढलेला रस्ता जबाबदार आहे. हा रस्ता अमरावती शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या सिंभोरा येथून येणाऱ्या मुख्य पाईपलाईनवरून गेला आहे. कंपनीपासून ५०० ते ६०० मी. अंतरावर ही पाईपलाईन आहे. सतत जड वाहने गेल्यामुळे या मुख्य पाईपलाईनला तडा जाऊ शकतो. हा धोका लक्षात घेऊन पाईपलाईनवरून ज्या ठिकाणी रस्ता गेला आहे तेथे पाईपलाईनला क्राॅस कनेक्शन बसवण्यात आले. 
 
उर्ध्व वर्धा प्रकल्पातून पाणी सिंभोरा येथे आणले जाते. तेथून प्रत्येकी २५० अश्वशक्तीच्या महाकाय पंपांद्वारे पाणी या १५०० मि.मी. व्यासाच्या पाईप लाईनद्वारे शहरात पाठवले जाते. पाईपलाईनच्या या मार्गावर एकावर एक असे ११२ +११२ एकूण २२४ एअरवाॅल्व्ह बसवण्यात आले आहेत. हे वाॅल्व्ह सतत नादुरुस्त होत असतात. त्यापैकी ८० वाॅल्व्हच्या दुरुस्तीचे कामही करण्यात आल्याची माहिती झाले.
 
सातत्याने एअर वाॅल्व्ह नादुरुस्त होत असल्यामुळे आता त्यांच्या जागी टॅम्परप्रूफ एअरवाॅल्व्ह आणि त्यांच्या वर ग्लँडलेस स्विस वाॅल्व्ह बसवण्यात आले आहेत. यादरम्यानच शहरातील टाक्याही स्वच्छ केल्या जाणार आहेत. या टाक्यांमध्ये पाईप लाईनद्वारे पाणी आणले जाते. त्यानंतर शहरामध्ये पाणीपुरवठा होतो. 
 
तपोवन येथील शुद्धिकरण केंद्राचीही स्वच्छता 
सिंभोरायेथून पाणी तपोवन येथील जल शुद्धिकरण केंद्रात आणले जाते. धरणातील पाणी थेट येत असल्यामुळे त्यात माती, गाळ, शेवाळही असते. त्यामुळे पाणी स्वच्छ करावे लागते.यासाठी पाण्यात पीएसी पावडर, ब्लिचिंग पावडर घालण्यात आले. त्याचप्रमाणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या टाक्यांचीही स्वच्छता करण्यात आली. शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यासाठी त्यात पावडर टाकण्यात आले आहे. हे शरीरासाठी हानीकारक नसल्याची माहितीही अधीक्षक अभियंत्यांनी दिली. 
बातम्या आणखी आहेत...