आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हॉट्सअॅपचा संवाद आता पूर्णपणे गोपनीय, व्हाॅटसअॅप कंपनीलाही पाहता येणार नाही संवाद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यवतमाळ- व्हॉटसअॅपवरहोणारा संवाद आता पूर्णपणे सुरक्षित झाला असून, संदेश पाठविणारी ताे रीसिव्ह करणारी व्यक्तीच हा संदेश पाहू शकेल. वापरकर्त्या व्यक्तींचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य गोपनीयता अबाधित राहावी त्याचा आदर व्हावा, याकरिता ‘अॅड-टू-अॅड एनक्रिप्शन’ हे नवीन फीचर व्हाॅटसअॅपने विकसित केले अाहे.

या नवीन फीचरमुळे यापुढे व्हाॅट्सअॅपचा डेटा कोणीही हॅक करू शकणार नाही.
अमेरिकेत दहशतवाद्यांचा आयफोन तपासण्यासाठी ‘एफबीआय’च्या अधिकाऱ्यांनी कंपनीच्या परवानगीशिवाय फोन हॅक केला होता.

या पार्श्वभूमीवर मोबाइल कंपनी आणि पोलिस तपास यंत्रणा ‘एफबीआय’ यांच्यातल्या कायदेशीर लढाईनंतर कंपनीने हा निर्णय घेतला आहे. या आधी व्हॉटसअॅपवर दोन व्यक्तींमध्ये पाठविले जाणारे संदेश सहज हॅक करता येऊ शकत होते. वापरकर्त्याची खासगी माहिती सुरक्षित राहावी, यासाठी गेल्या दोन वर्षांपासून व्हॉटसअॅपचे या फीचरवर काम सुरू होते. व्हाॅटसअॅपच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या स्पष्टीकरणानुसार ग्राहकांचा डेटा अाणि चॅट सुरक्षित ठेवण्यालाही यापुढे प्राधान्य देण्यात येणार अाहे. त्यासाठीच अॅड टू अॅड हे फीचर तयार करण्यात अाले अाहे. यातील एनक्रिप्शनद्वारे संवाद अधिक सुरक्षित हाेणार अाहे. ताे हॅक करणे हॅकर्सलाही शक्य हाेणार नाही. व्हाॅटसअॅप कंपनीलाही हा संवाद पाहता येणार नाही. यात वैयक्तिक चॅट, ग्रुप चॅट, व्हिडिअाे अाणि व्हाइस मेसेजचा समावेश असून नव्या फीचरबाबत माहिती मिळाली आहे.

तपास यंत्रणांची डाेकेदुखी
व्हॉटसअॅपसुरक्षितझाल्यामुळेतपास यंत्रणांची डोकेदुखी वाढणार आहे. कारण, पूर्वी एखाद्या तपासात जर तपास यंत्रणांना संदेश तपासायचे असतील, तर सहज शक्य हाेत हाेते. परंतु, आता मात्र कंपनीशी पत्रव्यवहार करून आणि परवानगी घेऊन, तसेच तांत्रिक अडथळे पार करून हे करावे लागेल. असे करूनही हाती काही ठोस लागेल याची खात्री मिळणार नाही,असे आयटी क्षेत्रातील सूत्रांनी सांगितले.