आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिवाळी अधिवेशनात आठच दिवस कामाची शक्यता; शेतकरी दिंडी, मोर्चामुळे दोन दिवस जाणार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- सोमवार ११ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या नागपूर हिवाळी अधिवेशनात कामाचे दहा दिवस दर्शवण्यात आले आहेत. मात्र पहिल्या दिवशी ११ डिसेंबरला राष्ट्रवादी काँग्रेसची शेतकरी दिंडी तसेच दुसऱ्या दिवशी १२ डिसेंबरला काँग्रेस-राष्ट्रवादीचा संयुक्त मोर्चा लक्षात घेता प्रत्यक्षात आठच दिवस काम होण्याची शक्यता आहे. हिवाळी अधिवेशनासाठी िवधान परिषद अध्यक्ष आणि िवधानसभा सभापतींचा राजदंड शुक्रवारी नागपुरात आला. सध्या हिवाळी अधिवेशनाची लगबग सुरू असून आमदार निवास, रविभवन, नागभवनसह विधिमंडळाची रंगरंगोटी डागडुजी सुरू आहे. 


पहिल्या आठवड्यात ११ ते १५ असे पाच दिवस कामकाज अाहे. तर शनिवार १६ रविवार १७ डिसेंबर सुटी आहे. दुसऱ्या आठवड्यात १८ ते २२ असे कामकाजाचे दिवस आहे. सध्या तरी दोन आठवड्यांचे कामकाज ठरले आहे. अधिवेशनाचा कालावधी एक आठवड्याने वाढल्यास २६ ते २९ असे चारच दिवस काम होईल. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली वाहून कामकाज संपते. दुसऱ्या दिवशी मोर्चात सहभागी होण्यासाठी िवरोधी पक्षाचे सदस्य शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून गोंधळ घालण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

बातम्या आणखी आहेत...