आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिवाळी अधिवेशन : बाबा-दादांची फटकेबाजी; आता बेनामी संपत्ती लक्ष्य, मुख्यमंत्र्यांचा इशारा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
निवडणुका डोळ्यासमोर ठेवून नोटाबंदीचा निर्णय - Divya Marathi
निवडणुका डोळ्यासमोर ठेवून नोटाबंदीचा निर्णय
नागपूर - नोटबंदीचा निर्णय उत्तर प्रदेश आणि पंजाबच्या निवडणुका डोळ्यापुढे ठेवून घेतलेला राजकीय निर्णय असून त्यात सर्वसामान्य जनता भरडली जात असल्याची टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी केली.
ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या जिल्हा बँकांवर सरकारने दाखवलेला अविश्वास हा ग्रामीण अर्थव्यवस्थेवरील हल्ला असल्याची टीका करताना सरकारने तातडीने या बँकांचे व्यवहार सुरू करून दिलासा द्यावा, अशी मागणीही या नेत्यांनी विधानसभेत बोलताना केली.
प्रश्नोत्तराच्या तासानंतर विधानसभेत नोटबंदीवर चर्चा सुरू झाली. या चर्चेची सुरुवात करताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नोटबंदीच्या निर्णयातून केंद्र सरकारने देशातील ८० ते ९० कोटी जनतेला कामाला लावल्याचा आरोप केला.
जगभरात या निर्णयाचे कुठल्याही तज्ज्ञाने स्वागत केलेले नाही, याकडे लक्ष वेधून चव्हाण म्हणाले, काळा पैसा, बनावट नोटा आणि दहशतवादाला आळा घालण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला असेल तर ते स्वागतार्हच आहे.
विरोधी पक्षांनी त्याचे स्वागतही केले आहे. मात्र, या निर्णयामागील खरे कारण राजकीय आहे. पंजाब आणि उत्तर प्रदेशच्या निवडणुका डोळ्यापुढे ठेवूनच हा निर्णय घेतला गेला.
आजवरच्या निवडणुकांमध्ये भाजपने काळ्या पैशाचा वापर केला नाही हे छातीठोकपणे सांगावे, असे आव्हान देऊन चव्हाण यांनी दोन हजाराच्या नव्या नोटा भाजपला काळा पैसा हाताळण्यासाठी मदत व्हावी म्हणूनच छापण्यात आल्याचा आरोप केला.
सर्व नोटा बँकांमध्ये जमा होत असतील तर सरकारने हल्ला केला तरी कशावर? या निर्णयामुळे भ्रष्टाचार थांबला काय? असे प्रश्न निर्माण होणार आहेत.
पाकिस्तानात बनावट नोटा कुठे छापल्या जातात हे आपल्या रॉला माहिती आहे. त्या यापुढे छापल्या जाणार नाहीत, यासाठी सरकार काय करतेय, असा सवालही त्यांनी केला. पंतप्रधान मोदी आता काळ्या पैशावर नव्हे तर कॅशलेस अर्थव्यवस्थेवर बोलत आहेत.
कॅशलेस व्यवहार पूर्णपणे शक्य नसल्याचे सांगत चव्हाण म्हणाले की, नेट कनेक्टिव्हीटी, वीज नसेल तर असे व्यवहार कसे होणार, या प्रश्नाचे उत्तर नाही. उलट संपूर्ण अर्थव्यवस्था हॅक होण्याचा सायबर धोका आहे. जिल्हा बँकांवर सरकारने अविश्वास दाखवल्याने ग्रामीण अर्थव्यवस्थाच कोलमडली आहे. शेतकऱ्यांचे प्रचंड हाल सुरू आहेत. राज्यातील पाॅवरलूम बंद आहेत.सर्वसामान्य रांगेत आहेत. त्यामुळे आता तरी सरकारने जिल्हा बँकांचे व्यवहार तातडीने सुरू करण्याची गरज असल्याचे चव्हाण म्हणाले.
पुढील स्लाइड्सवर वाचा, विरोधकांना फडणवीसांनी दिलेली उत्तरे आणि आमदारांनी मांडलेली मते..
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...