आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

..अन् ती’ धावत्या रेल्वेत झाली आई, गोंडस बाळाला दिला जन्म

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर -  १२८४४ अहमदाबाद-पुरी एक्सप्रेसमध्ये एका महिलेने गोंडस बाळाला जन्म दिला आहे. नागपूर मुख्य रेल्वे स्थानकावर गाडी येताच संबंधित महिला व तिच्या बाळाला डॉक्टरांच्या चमूने तपासून उपचार केले. आई व बाळाला इंजेक्शन दिले. जन्मापुरती नागपूरशी असलेली नाळ कापल्यावर बाळ व बाळंतीण रायपूरला रवाना झाले आहे.
 
अहमदाबाद-पुरी एक्सप्रेस वर्धेहून नागपूरकडे येत होती. या गाडीतील जनरल कोचमधून प्रवास करणाऱ्या महिलेला प्रसुती कळा सुरू झाल्या. त्यावेळी गाडीने वर्धा स्टेशन सोडले होते. १०.०३ वाजता मुख्य रेल्वे स्थानकावर याची सूचना देण्यात आली. तेथे डाॅक्टर, नर्स, सफाई कर्मचारी, अटेंडस अशी चमू तयार ठेवण्यात आली होती. परंतु, तत्पूर्वीच बुटीबोरीजवळ महिलेला कळा तीव्र यायला लागल्या. महिला बाळंत होणार हे डब्यातील महिलांच्या लक्षात आले. त्यांनी शेजारील डब्यातील काही महिलांची मदत घेऊन तेथेच साड्या व चादरीचा आडोसा तयार केला. काही क्षणातच महिलेने एका गोंडस बाळाला जन्म दिला. त्याचा आनंद संपूर्ण डब्याने साजरा केला. मुख्य रेल्वे स्थानकावर गाडी येताच डॉ. प्रिती यांनी बाळ व बाळंतीणीला तपासले. नाळ कापल्यानंतर रक्तस्राव होऊ नये म्हणून इंजेक्शन दिले. महिलेने पुढे जाण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर ते रायपूरसाठी निघून गेले, असे मुख्य जनसंपर्क अधिकारी पी. डी. पाटील यांनी सांगितले.
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...