आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोकर्डा येथे नारीशक्तीचा विजय, दारू दुकानाला प्रशासनाने लावले सील

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दारूच्या दुकानाला सील लावताना. - Divya Marathi
दारूच्या दुकानाला सील लावताना.
कोकर्डा - महिलांच्या तीव्र आंदोलनानंतर संत गाडगेबाबांच्या भूमीत एकमेव सुरू असलेल्या दारूच्या दुकानाला बुधवारी (दि. २४) रात्रीच्या सुमारास प्रशासनाने सील ठोकले. या कारवाईनंतर महिलांनी तूर्तास आंदोलन मागे घेतले आहे. दरम्यान, दारूचे दुकान कायमस्वरूपी बंद करण्यासाठी जून रोजी मतदान घेण्यात येणार अाहे. 
 
संत गाडगेबाबांची जन्मभूमी असलेल्या शेंडगावपासून दीड किमी अंतरावर असलेल्या कोकर्डा येथील झेंडा चौकातील दारूचे दुकान कायमस्वरूपी बंद करावेे या मागणीसाठी परिसरातील कोकर्डा, शेंडगाव, ब्राह्मणवाडा, देऊळगाव, डोंबाळा परिसरातील गावातील महिलांनी दुकानासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले होते. विशेष म्हणजे या दुकानासमोरच स्वातंत्र्य प्रजासत्ताक दिन साजरा होतो. तीन दिवसांनंतर दारूच्या विरोधात एकजुटीने दिलेल्या लढ्यात आज यश आले. प्रशासनाने रात्रीच्या सुमारास दुकानाला सील ठोकले. दुकान कायमस्वरूपी बंद करण्यासाठी जून रोजी मतदानाचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. महिलांच्या बाजूने निकाल लागल्यास दुकान कायमस्वरुपी बंद करण्यात येईल. अन्यथा जूनपासून दुकान पुर्ववत सुरू होईल असा निर्णय प्रशासनाने दिला आहे. दुपारी पंचायत समिती सभापती प्रियंका दाळू यांनी महिलांची भेट घेऊन मार्गदर्शन करीत निर्णयावर ठाम राहण्यास सांगितले. या वेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे अंजनगावचे तालुका प्रमुख प्रदीप निमकाळे, शनि शेळके, अविनाश टाक, शुभम निमकाळे, अनुप काकड यांच्यासह कार्यकर्त्यांचा आंदोलनाला पाठिंबा होता. दारूबंदीसाठी स्वर्गव माहोरे यांनी कोकर्डा येथे ठराव मांडला होता. तो ग्रामसभेत मान्य करण्यात आला होता, हे विशेष. दरम्यान बुधवारी दुपारी तहसीलदार पुरुषोत्तम भुसारी यांनी आंदोलनकर्त्या महिलांची भेट घेऊन त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु दुकान कायम स्वरुपी बंद करण्याच्या मागणीवर महिला कायम असल्याने त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून चर्चा केली. प्रशासनाच्या आदेशावरून रात्रीच्यासुमारास दारूचे दुकान सील करण्यात आले. गावात कायमस्वरुपी दारू बंदी करण्यासाठी जून रोजी मतदान घेण्यात येणार आहे. निकाल महिलांच्या बाजूने लागल्यास दुकान कायम बंद केले जाईल, अन्यथा दुकान सुरू राहणार आहे. 
 
नारीशक्तीचा विजय होण्यासाठी प्रयत्न 
कोकर्डा येथील दारूचे दुकान कायमस्वरूपी बंद करण्यासाठी जून रोजी मतदान होेणार आहे. बहुतांश ठिकाणी दारु विक्रेत्यांनी मतदानाचा कौल आपल्या बाजूने लावून घेतल्याची उदाहरणे आहेत. कोकर्डा येथेही असा प्रकार होऊ शकतो. तो तसा होऊ नये यासाठी कार्यकर्ते दक्ष आहेत. 
 
५० टक्केच्यावर मतदान आवश्यक 
शासनाच्या १२ फेब्रुवारी २००९ च्या मुंबई दारूबंदी कायदा, १९४९ मधील सुधारित अधिसूचनेनुसार दारूचे दुकान कायमस्वरूपी बंद करण्यासाठी घेण्यात येणाऱ्या मतदानात एकूण मतदारांच्या ५० टक्के मतदारांनी दुकान बंद करण्याच्या बाजूने मतदान केल्यास दुकान कायमस्वरूपी बंद करण्यात येते. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...