आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी तोडला अमेरिकन शेफ बेंजामिन पेरि यांचा रेकॉर्ड

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- सुप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी अमेरिकन शेफ बेंजामिन पेरि यांचा 41 तासाचा गिनीज बुक रेकॉर्ड तोडला आहे. मनोहर यांनी 56 तास कुकिंग, 1001 रेसिपीज व शाकाहारी रेसीपीज असे 3 नवे जागतिक विक्रम करून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड  रेकॉर्ड केले आहे.
 
ख्यातनाम शेफ विष्णू मनोहर यांनी शुक्रवार, २१ एप्रिल रोजी सलग ५२ तास पाककृती करण्याच्या विश्वविक्रमाला सत्यनारायणाचा रव्याचा शिरा अन्नपूर्णेची पूजा करून सुरूवात केली. उत्तर अंबाझरी मार्गावरील इन्स्टिट्यूट आॅफ इंजिनिअर्सच्या सभागृहात २१ रोजी सकाळी वाजता अंजनगावसूर्जी येथील देवनाथ पीठाचे मठाधीपती जितेंद्रनाथ महाराज, विष्णू मनोहरांचे वडील दिगंबर मनोहर, आई स्नेहलता मनोहर, पोलिस आयुक्त के. व्यंकटेशम यांच्या उपस्थितीत शुभारंभ झाला. आता सलग ५२ तास म्हणजे २३ एप्रिल २०१७ ला सायंकाळी वाजेपर्यत वर्ल्ड रेकाॅर्डची प्रक्रिया सुरू राहिल. वर्ल्ड रेकाॅर्ड कार्यक्रमाच्या समारोपाला जगप्रसिद्ध हाॅटेल व्यवसायी विठ्ठल कामत, शेफ संजीव कपुर उपस्थित रहाणार आहे. 
 
विदर्भाचे सुप्रसिद्ध शेफ यांनी अमेरिकन शेफ बेंजामिन पेरि यांचा 41 तासाचा गिनीज बुक रेकॉर्ड मोडित काढला आहे. 52 तास कुकिंग, 1001 रेसिपीज व शाकाहारी रेसीपीज अश्या 3  नव्या जागतिक विक्रमाकडे वाटचल सुरु केली आहे.
 
शुक्रवारी सायंकाळी वाजता सलग ११ तास झाले. अकराव्या तासाला मनोहर यांनी १२० पदार्थ तयार केला. हे पदार्थ विक्रीसाठी नव्हते. या विश्वविक्रमाचे साक्षीदार असलेल्या रसिक खवय्यांना नि:शुल्क खाण्यास मिळत आहे. मनोहर यांना प्रोत्साहन देण्यासाठी रसिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केले आहे. मन प्रफुल्लीत करणारे संगीतही सुरू आहे.
 
कुकिंग मॅरेथाॅनचा ४० तासांचा वर्ल्ड रेकाॅर्ड अमेरिकेतील एम. बेंजामिन जे पेरी यांच्या नावाने आहे. मनोहर यांना तिसऱ्या प्रयत्नात परवानगी मिळाली. सुरूवातीला ४५ तासांचा सराव केला. अगदी मुंबई विमानतळावरील स्वयंपाकगृहात तेथील शेफसोबतही मनोहर यांनी सराव केला. कार्यक्रमात दर एक तासाने पाच मिनिटांचा ब्रेक घेता येणार आहे. उपराजधानीतील रसिक खवय्यांसाठी ही एक पर्वणीच आहे. अनेकजण याचा लाभ घेत आहेत. 
 
विक्रमाच्या व्हिडीओ क्लिप्स यू-ट्यूबवर 
सर्व पाककृती शाकाहारी आहे. पारंपरिक भाज्या, फळे, स्नॅक्स, पोळ्या, सुप, मसाले, बेकरीचे पदार्थ आदी एक हजार पदार्थ तयार करण्यात येत आहे. या पदार्थांचे वजन ३५०० किलो राहणार आहे. हे सर्व पदार्थ तयार करण्यासाठी लागणारे ३६००० ग्रॅम तांदुळ, ५०० किलो भाज्या, २०० किलो पनीर, आलू, लसुण, कांदा मसाले १०० किलो, वेगवेगळ्या डाळी ८० ते १०० किलो हे सर्व जिन्नस तयार ठेवण्यात आले आहे. प्रत्येक पदार्थाची तसेच कोणता पदार्थ किती वेळेत किती वाजता तयार केला याची नोंद ठेवल्या जात आहे. या विक्रमाच्या व्हीडिओ क्लिप्स यू-ट्यूबवर टाकण्यात येत आहे. 
 
वसतिगृहासाठी निधी देणार 
या सर्व पाककृतींचे एक पुस्तक प्रकाशित करण्यात येणार आहे. पुस्तक विक्रीतून आलेली रक्कम शेतकऱ्यांच्या मुलांसाठी बांधण्यात येणाऱ्या वसतिगृहासाठी देण्यात येईल, असे ख्यातनाम शेफ विष्णू मनोहर यांनी सांगितले.
 
पुढील स्लाईडवर पाहा, विष्णू मनोहर यांच्या 52 तास पाककृतीचा व्हिडीओ आणि फोटोज ...
 
बातम्या आणखी आहेत...