आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जिल्हा प्रशासनाची झडती, यवतमाळ जिल्हा परिषदेत कर्मचाऱ्यांची अनागोंदी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अध्यक्ष डॉ. आरती फुपाटे, सदस्य ययाती नाईक, सीईओ डॉ. कलशेट्टी फाईल्सची पाहणी करताना. - Divya Marathi
अध्यक्ष डॉ. आरती फुपाटे, सदस्य ययाती नाईक, सीईओ डॉ. कलशेट्टी फाईल्सची पाहणी करताना.
यवतमाळ- विकासकामाकडे दुर्लक्ष करीत असल्याच्या कारणावरून जिल्हा परिषद अध्यक्षांसह सदस्यांनी आज, सप्टेंबर रोजी पंचायत, शिक्षण, पाणीपुरवठा, बांधकाम आदी विभागांची चांगलीच झाडाझडती घेतली. तक्रारींचा पेटाराच सीईओंसमोर मांडण्यात आला. त्यामुळे एका ग्रामसेवकाला निलंबित, तर पुसद बीडीओ, पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना शोकॉज नोटीस बजावण्यात आली आहे. प्रशासकीय कामकाजात सुधारणा झाल्यास ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे लेखी तक्रार करू, असा इशारा कर्मचाऱ्यांना देण्यात आला आहे.
शेंबाळपिंपरी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक गेल्या महिन्याभरापासून सुटीवर आहे. दि. १५ ऑगस्ट रोजी आयोजित ग्रामसभेच्या रजिस्टरवरच्या कोऱ्या कागदावर स्वाक्षरी करून ग्रामसेवक गायब झाला आहे. यासंदर्भात पंचायत समिती, जिल्हा परिषद पंचायत विभागाकडे तक्रार करण्यात आली होती. मात्र, तक्रारींच्या अनुषंगाने कुठल्याच प्रकारची चौकशी झाली नाही. परिणामी, ग्रामसेवक बी. व्ही. पारटकर यांना निलंबित करा, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य ययाती नाईक यांनी केली. या प्रकरणातील प्राप्त माहितीनुसार मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी ग्रामसेवक पारटकर यांना निलंबित केले. त्याचप्रमाणे कामातील दिरंगाईस जबाबदार पुसद पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जालिंधर पठारे यांना शोकॉज बजावण्यात आले आहे. तद्नंतर शिक्षण विभागाचा आढावा घेण्यात आला. या आढाव्यातही शिक्षण विभागाने पुसद तालुक्यावर केलेले दुर्लक्ष सदस्य ययाती नाईक यांनी स्पष्टपणे मांडले. प्रामुख्याने पुसद तालुक्यात एकही डिजिटल स्कूल नसल्याचा उल्लेख केला. विशेष म्हणजे पुसद तालुक्यात ५४ शाळेला ई-क्लासची जमीन आहे. तरीसुद्धा डिजिटल स्कूल नसणे म्हणजे एक शोकांतिकाच आहे. अनेक किचनशेडचे बांधकाम पूर्ण झाले असून, आजही या किचनशेडमध्ये खिचडी शिजत नाही. निव्वळ देखाव्यासाठीच हे किचनशेड बांधकाम करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. त्यानंतर पाणीपुरवठा, बांधकाम, कृषी, आरोग्य विभागातील समस्यांचा आढावा घेण्यात आला. या आढाव्यात जिल्हा परिषद, पंचायत समितीतील कामकाजाचे वाभाडे निघाल्याचे दिसते.

टँकरमुक्तीसाठी प्रयत्न करणार
पाणीपुरवठा विभागाचा आढावा घेण्यात आला. यंदाची टंचाई मोठ्या प्रमाणात होती. टँकरही बऱ्याच गावांमध्ये लागले होते. पुढील वर्षी अशी परिस्थिती उद््भवू नये, यासाठी आतापासूनच नियोजन करण्यात येत आहे. डॉ.आरती फुपाटे, अध्यक्ष,जिल्हा परिषद.

तालुक्यातील ३१ शाळा जीर्णावस्थेत
पुसदतालुक्यातील एकूण शाळांपैकी जिल्हा परिषदेच्या ३१ शाळा जीर्णावस्थेत आहेत. या शाळा कधी पडतील याचाही नेम नाही. त्यामुळे नवीन इमारत बांधकामाचा प्रस्ताव तयार करावा, शाळा निर्लेखित कराव्या, अशी मागणी करण्यात आली होती. मात्र, या मागणीकडे अद्यापही लक्ष देण्यात आलेच नसल्याचा आरोप ययाती नाईक यांनी केला.

ग्रामविकासमंत्र्यांकडे तक्रार करू
जिल्हापरिषदेतील अधिकारी कामकाजाबाबत गांभीर्याने घेत नाहीत. केवळ दिवस लोटायचे, या उद्देशाने सर्वजण काम करीत आहे. समस्या सोडवण्यासाठी आयोजित ग्रामसभेची साधी माहिती एचओडींना नसते. ही बाब अत्यंत गंभीर असून, यासंदर्भात ग्रामविकासमंत्र्याकडे धाव घेणार आहो. ययातीनाईक, सदस्य, जिल्हा परिषद.

व्हिजिटपासून लोकप्रतिनिधी अनभिज्ञ
जिल्ह्यातीलविविधांगी समस्यांकडे जिल्हा परिषद प्रशासन दुर्लक्ष करीत आहेत. त्यात विविध विभागांचे अधिकारी तालुक्याच्या ठिकाणी भेटी देतात. मात्र, याची पुसटशी कल्पना स्थानिक लोकप्रतिनिधींना होत नाही. विशेष म्हणजे या व्हिजिटमध्ये नेमके झाले काय, याचीही माहिती दिल्या जात नसल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला.

शाळांना दिलेल्या निधीपैकी सात लाख रुपये अद्याप अखर्चित
शिक्षणविभागाने पुसद तालुक्यातील शाळांना विविध कामे तसेच सादील खर्चासाठी मोठ्या प्रमाणात निधी दिला होता. मात्र, बऱ्याच शाळांनी हा निधी खर्चच केला नाही. शेवटी शासनाने अखर्चित निधी जमा करण्याचे निर्देश दिले होते. त्याअनुषंगाने तब्बल लाख रुपये एकट्या पुसद तालुक्यातून परत गेले आहे. यासंदर्भातही खेद व्यक्त करण्यात आला.