आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्व कार्यालयांमध्ये २१ जूनला जागतिक योग दिन, राज्य शासनाचा ४५ मिनिटांचा मुख्य कार्यक्रम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- संयुक्तराष्ट्र संघाने २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून घोषित केला आहे. अमरावती शहरासह संपूर्ण राज्यातील सर्व शैक्षणिक शासकीय कार्यालयांसह विविध संस्थांमध्ये हा दिन साजरा होणार आहे. यासाठी शासनाद्वारे ४५ मिनिटांचा योग कार्यक्रमही आखण्यात आला आहे. यात सूर्यनमस्काराचा समावेश नाही. सूर्यनमस्कार हा गतवर्षीप्रमाणेच यंदाही ऐच्छिक असून, ज्या संस्थांना सूर्यनमस्कार घ्यायचा आहे, त्यांना ४५ मिनिटांचा मुख्य कार्यक्रम आटोपल्यानंतर तो घेता येईल, असेही शासनाद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे.

पाच हजार वर्षांपेक्षा प्राचीन योग विद्या भारताने संपूर्ण जगाला दिली आहे. व्यक्तीच्या शारीरिक आत्मिक विकासासाठी योग विद्या सहायक असल्यामुळेच यंदा दुसऱ्या जागतिक योग दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे आयोजन राज्यातील युवक तसेच सर्वसामान्यांना मोठ्या प्रमाणावर सामावून घेऊन करायचे आहे. यासाठी योग उत्सव, चर्चासत्र, कार्यशाळा, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन शाळा, महाविद्यालये, विद्यापीठ, एनएसएस, नेहरू युवा केंद्र, विविध संस्था युवा संघटनांमध्ये करण्यात यावे, असे राज्य शासनाला केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाने कळवले आहे.

आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यासाठी प्रशिक्षकांना प्रशिक्षित करणे, योग दिन आयोजनाबाबत मार्गदर्शन करणे यासाठी कैवल्यधाम, लोणावळा, पुणे, दि योगा इन्स्टिट्यूट, सांताक्रूझ, मुंबई रमामणी अय्यंगार मेमोरियल योग इन्स्टिट्यूट, पुणे या तीन योग संस्थांनी सहकार्य करण्याचे मान्य केले आहे.

आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून अमरावती शहरासह संपूर्ण राज्यातील सर्व शाळांमध्ये योग दिन साजरा करण्याच्या सूचना शालेय शिक्षण क्रीडा विभागामार्फत विभागीय कार्यालयांना देण्यात आल्या आहेत. आंतरराष्ट्रीय योग दिन सर्व शाळांसोबतच शासकीय कार्यालयांमध्ये आयोजित करण्याचा िनर्णय शासनाने घेतला आहे.
या अनुषंगाने अंबानगरीतील सर्व शासकीय,निमशासकीय कार्यालयांसह विविध क्रीडा संघटनांसोबतच शाळांमध्ये जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे.

विकलांग, दिव्यांग व्यक्तींनाही सहभागी करून घेण्याच्या सूचना
अांतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात विकलांग दिव्यांग व्यक्तींना सहभागी करून घेण्यासाठी स्थानिक स्तरावर प्रयत्न करण्यात यावे, तसेच योगासाठी लागणाऱ्या साधनांचा वापर करण्यास प्राधान्य देण्यात यावे, असे निर्देशही, प्रधान सचिव नंद कुमार यांनी शाळा, शासकीय कार्यालयांना दिले आहेत.
बातम्या आणखी आहेत...