आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेफान दुचाकीस्वारांची आता वणी शहरात रस्त्यांवर "धूम'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वणी- सध्यावणी शहरात धूमस्टाईल बाईकस्वारांचा मुक्त संचार सुरू आहे. येथील अत्यंत कमी रूंदीच्या रस्त्यावर जणू काही स्पर्धाच लागल्याचे चित्र बघायला मिळत आहे. मात्र या बाईकस्वारांच्या धूम स्टाईल स्पर्धेमुळे अपघाताची शक्यता बळावली आहे. या धूम स्टाईल बाईकस्वारांना चाप लावणार काय? असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.

दुचाकी बनवणाऱ्या कंपन्यांनी जास्त क्षमता असलेल्या नवनवरन दुचाकी बाजारात आणल्या आहेत. टिव्ही सिनेमात दुचाकींची स्पर्धा असते अगदी तशाच दुचाकी घेऊन कॉलेजकुमार सुसाट दुचाकी चालवण्याची जणू स्पर्धाच करत आहे. धावण्याची क्षमता जास्त असलेल्या दुचाकी घेऊन काॅलेजात जाणारी मुलेसुद्धा आता मागे राहिली नाही. अगदी ‘धूम’ सिनेमात जशी स्पर्धा लागतेय तशीच वणी शहरातही लागते. येथील रस्ते अगदी अरूंद आहेत. या रस्त्यावरून एकाच वेळी दोन वाहने नेणेसुद्धा कठीन आहे. मात्र सुसाट दुचाकीस्वार कोणाचीही पर्वा करता अगदी बेभान वाहने चालवताना दिसत आहे. शहरातील नांदेपेरा मार्गावर जगन्नाथ महाराज कॉलेज, लॉयन्स कॉलेज आहे. वरोरा मार्गावर लोकमान्य टिळक कॉलेज, तर छत्रपती शिवाजी महाराज चौक ते लालगुडा मार्गावरसुद्धा आयटीआय पब्लिक कॉलेज आहे. या सर्व रस्त्यावर टवाळखोर दुचाकीस्वारांची चांगलीच स्पर्धा सुरू असते. मात्र या रस्त्यावरून जाणाऱ्या सर्वसामान्यांना जीव मुठीत घेऊन चालावे लागते. दुचाकी एका बाजूने झुकवत या टोकाचे त्या टोकाला नेऊन गाडी चालवताना कित्येकांना त्रास झालेला आहे. परंतू याबाबत वाद उपस्थित होईल या भीतीने कोणीही तक्रार देण्यास पुढे सरसावत नाही. या सुसाट चालवणाऱ्या दुचाकीस्वारांच्या स्पर्धेमुळे सर्वसामान्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. मग पोलिस अन् वाहतूक पोलिस या सुव्यवस्था जोपासणाऱ्या प्रशासकीय संस्था संबध जोपासत बघ्याची भूमिका निभवत आहे.
याबाबत अनेकांनी संबधीतांशी चर्चासुद्धा केली आहे. तरीसुद्धा सुसाट बाईकस्वारांना अद्याप चाप बसलेला नाही. सायंकाळच्या वेळेस तर नांदेपेरा मार्गावर एकच दुचाकी सुसाट वेगाने चार चकरा मारताना दिसत आहे. एखादी वेळे चुकून लहान बाळ अथवा सर्वसामान्य माणूसाने रस्ता ओलांडला तर त्या जागी त्याचा मृत्यू निश्चित आहे, अशी दशा सध्या वणी शहरातील रस्त्यांची झाली आहे. या धूम स्टाईल दुचाकीस्वारांना पोलिस प्रशासन चाप लावणार काय असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.

सध्या परिवहन विभाग वाहतूक पोलिस विभाग रस्ता सुरक्षा अभियान राबवत आहे. या सप्ताहादरम्यान अपघातविरहित सप्ताह व्हावा असा दृष्टीकोण राहताे. तर पोलिस हे वाहनचालकांना वाहतुकीचे नियम शिकवत असतात मात्र या वाहतूक पोलिसांनी आता वणीतील दुचाकीस्वारांना नियम शिकवले पाहिजे.

काळजी घेण्याची गरज
आपल्यापाल्यांनाशिक्षणात अडचणी निर्माण होऊ, नये म्हणून पालक पाल्यांना दुचाकी घेवून देतात खरे, परंतू ते व्यवस्थित दुचाकी हाताळतात की नाही हेसुद्धा बघत नाही. त्यामुळे या प्रकाराकडे पोलिसांसह पालकांनी ही लक्ष देण्याची गरज आहे. '' डॉ. विवेक गोफणे, वणी.

मुलीसुद्धा विसरतात भान
पालकांनीआपल्या पाल्यांना शाळा ट्यूशनला जाण्यासाठी मुलींना मोपेड घेऊन दिल्या आहेत. त्या मोपेडची क्षमता दोन व्यक्तीची असतांना या मुली सर्रास तिन बसतात आपल्या मागून कोणते वाहन येत आहे की नाही तसेच आपल्या समोरील वाहनांना ओव्हरटेक करून भरधाव रस्त्याने वाहन चालवत असल्याचे प्रकार बघायला मिळत आहे.