आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘आयजीं’पुढे मांडले पालकांनी ‘गाऱ्हाणे’, ‘वायपीएस’ शाळेतील लैंगिक अत्याचाराचे प्रकरण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यवतमाळ- वायपीएस शाळेत घडलेल्या घटनेसंदर्भात विशेष पोलिस महानिरीक्षक संजीव कुमार सिंघल यानी सोमवारी सकाळी १० वाजता पोलिस मुख्यालयातील सभागृहात पालकांची बैठक घेतली. त्यात सुरुवातीला किशोर दर्डा यांना अटक करण्यात आली असल्याची माहिती देत पालकांकडून या प्रकरणात आणखी काही सूचना असल्यास सांगण्याचे आवाहन केले.

गेल्या सहा दिवसांपासून शहरात धुमसत असलेली वायपीएस शाळेविरोधातील आग सोमवारी पहाटे किशोर दर्डा यांना अटक केल्यानंतर काही प्रमाणात शांत झाली. त्यानंतर सकाळी १० वाजता विशेष पोलिस महानिरीक्षक संजीव कुमार सिंघल यांनी पालकांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी सर्वप्रथम या प्रकरणात कायदा त्याची प्रक्रिया याची पूर्ण माहिती पालकांना समजावून सांगितली. न्यायालयात प्रकरण योग्य पद्धतीने चालवण्यासाठी पोलिस प्रशासनाला ठोस पुरावे आणि बयाण आवश्यक असल्याचेही स्पष्ट केले. प्रकरणाच्या तपासासाठी विशेष पथक गठीत करण्यात आले असून त्या पथकात असलेल्या सर्व अधिकाऱ्यांची नावे आणि त्यांचे संपर्क क्रमांक यावेळी पालकांना देण्यात आले. यासोबतच पालकांकडून करण्यात आलेल्या सूचनाही नोंद करण्यात आल्या. त्यात शाळेत मुला -मुलींची बैठक व्यवस्था वेगळी असावी, सहली दरम्यान काही पालकांनाही सोबत नेण्यात यावे, शाळेत मुलींच्या सुरक्षेची चोख व्यवस्था असावी अशा अनेक सूचना पालकांनी दिल्या. या प्रकरणात आणखी कुण्या पालकांना तक्रारी करायच्या असतील तर त्यांनी निर्भयपणे समोर यावे, त्यांच्या सुरक्षेची हमी पोलिस प्रशासन घेणार असे आवाहनही आयजींनी यावेळी केले. या बैठकीला पोलिस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह आणि इतर पोलिस अधिकारीही उपस्थित होते.

यवतमाळ पब्लिक स्कूलमधील अत्याचाराचा जनसामान्यांमाध्ये सर्वत्र निषेध होत आहे. या शिक्षकांना शासनाने फाशीची शिक्षा द्यावी, त्यांची पाठराखण करणाऱ्या शाळा व्यवस्थापन समिती तसेच संस्था चालकांविरूध्द गुन्हे दाखल करावे, अशी मागणी तालुका दैनिक वृत्तपत्र वार्ताहर संघाने आज उमरखेड येथे घेतलेल्या निषेध बैठकीत घेण्यात आली. या बैठकीत पत्रकारांना अमानुष मारहाण करणाऱ्या पोलिस प्रशासनाचा धिक्कार नोंदविण्यात आला. तसेच पत्रकारांच्या वतीने मूकमोर्चाद्वारे उद्या रोजी निवेदन देण्याचा निर्णय घेतला आहे.

पालकांचा जमाव वडगावरोड पोलिस ठाण्यात
पोलिस मुख्यालयात पार पडलेल्या पालकांच्या बैठकीनंतर सर्व पालक बाहेर पडले. त्या ठिकाणी त्यांच्यात चर्चा झाली. त्यानंतर आरोपींविरुद्ध आणखी पुरावे आवश्यक असल्याचे सांगत त्या ठिकाणी जमलेल्या पालकांनी पोलिस ठाण्यात तक्रारी देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर हे सर्व पालक वडगावरोड पोलिस ठाण्यात दाखल झाले. वडगावरोड पोलिस ठाण्यात आलेल्या २५ पालकांनी त्यांच्या तक्रारी वडागवरोड पोलिस ठाण्यात कागदावर लिहून दाखल केल्या. यावेळी वडगावरोड पोलिसांनी त्या सर्व तक्रारी घेऊन कारवाईस सुरुवात केली आहे.
‘वायपीएस’ सुरू करण्याचा निर्णय
यवतमाळपब्लिक स्कूलमध्ये घडलेल्या प्रकारापासून शाळा व्यवस्थापनाने शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी जिल्हाधिकारी आणि राज्यस्तरीय समितीने ही शाळा मंगळवार जुलै पासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. अमरावती येथील शिक्षण उपसंचालक एस. बी. कुळकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी जुलै रोजी यवतमाळ पब्लिक स्कूल येथे सर्व शिक्षकांसमवेत चर्चा केली. यात उद्यापासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी कुळकर्णी यांनी सर्व शिक्षकांना विश्वासात घेऊन नव्या उमेदीने काम करण्याची प्रेरणा दिली. तसेच येत्या काळात अशा प्रकारच्या घटना होऊ नये यासाठी सतर्क राहून आत्मविश्वासाने कार्य करण्यास सांगितले. यावेळी पालकांनी कोणतीही भीती बाळगता पाल्यांना शाळेत पाठवण्यात यावे, असे आवाहनही त्यांनी केले. शासनाकडून प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. सुचिता पाटेकर यांची शाळेवर नियंत्रक अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. यावेळी माध्यमिक शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी, प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. सुचिता पाटेकर, शिक्षण उपसंचालक आर. डी. तुरणकर, उपशिक्षणाधिकारी डॉ. वाल्मिक इंगोले आदी उपस्थित होते.
आज भाजप महिला प्रदेशाध्यक्ष शहरात
भारतीयजनता पार्टी महाराष्ट्र महिला मोर्चा सरचिटणीस माजी महापौर नागपूर ह्यांच्या नेतृत्वात यवतमाळ वाय.पी.एस. शाळेत मुलींवर झालेल्या लैंगिक शोषणाच्या विरोधात आय.जी. पोलिस अधीक्षक, यवतमाळ यांना सोमवारी दुपारी बारा वाजता एक निवेदन देण्यात आले. निवेदनात प्रामुख्याने शाळेतील दोन शिक्षकांना अटक करण्यात आली परंतु यात अाणखी काही कर्मचारी शिक्षक यात सहभागी असण्याची शक्यता आहे. त्यामुळे महिला विशेष पथकाद्वारे पालक विद्यार्थ्यांकडून माहिती घेऊन दोषींवर कारवाई करावी, संचालकाला अटक केली परंतु पालकांना विचारणा भेट दिली असता असे कळते की, त्यांनी पुरावे नष्ट केले आहे. तेव्हा त्यांच्यावर २०१ ही कलम लावावी. तसेच संचालकांची ही चौकशी करुन कठोर कारवाई करावी. मुलांच्या शिक्षणात बाधा होऊ नये याकरीता शाळेत पोलीस सुरक्षा द्यावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी अर्चना डेहनकर यांनी पालकांना सांगितले की, प्रदेश भाजपा महिला मोर्चाच्या अध्यक्षा माधवी नाईक ह्यांच्या नेतृत्वात मंगळवारी मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन संपूर्ण विषयाची सखोल चैकशी करुन दोषींवर कारवाई करणे तसेच त्यांची सी.बी.आय. चैकशी ची मागणी करणार आहे. या प्रसंगी प्रदेशाच्या उपाध्यक्षा निता कानडे, रेखा कोठेकर, यवतमाळ जिल्हा महिला मोर्चा अध्यक्षा ज्योती मानमोडे, महामंत्री माया शेरे, निर्मला विणकरे आदी पदाधिकारी हजर होत्या.

पालकांनी सावधगिरी बाळगणे गरजेचे
यवतमाळ यवतमाळपब्लिक स्कूलमध्ये घडलेल्या प्रकार अत्यंत किळसवाणा आहे. यासाठी पालकांनी सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. हा प्रकार उघडकीस आल्यामुळे दोषींवर कारवाई होणेच आहे. त्यामुळे पालकांनी घाबरता कुणाच्याही दबावाला बळी पडता, समोर येऊन तक्रारी द्याव्या, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केले. त्या येथील विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होत्या. पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, ही बाब अत्यंत घृणास्पद आहे. अशा प्रकरणात शाळा व्यवस्थापन मंडळाने सतर्कता दाखवणे गरजेचे होते. यातील दोषींवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे. यातून समाजात चांगला संदेश जाईल, असेही त्या म्हणाल्या.
बातम्या आणखी आहेत...