आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युग चांडक खून प्रकरण, फेब्रुवारी राेजी शिक्षा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- नागपूर शहरात दाेन वर्षांपूर्वी गाजलेल्या युग चांडक या बालकाच्या अपहरण करून खुनाच्या प्रकरणात अाराेपी राजेश धनलाल दवारे (वय १९) आणि अरविंद अभिलाष सिंह (वय २३) या दाेघांना शनिवारी सत्र न्यायालयाचे न्यायाधीश किशाेर साेनवणे यांनी दाेषी ठरविले. अाता त्यांची शिक्षा फेब्रुवारीला सुनावण्यात येणार अाहे. सप्टेंबर २०१४ रोजी पूर्व नागपुरातील छाप्रूनगर परिसरात ही घटना घडली होती.
प्रसिद्ध दंतरोगतज्ज्ञ मुकेश चांडक यांचा मुलगा युगचे अपहरण करुन त्याला अाराेपींनी पाटणसावंगी ते लोणखैरी दरम्यानच्या परिसरात ठार केले हाेते. डाॅ. चांडक यांनी नाेकरीवरून काढल्याच्या रागातून राजेश याने अापल्या साथीदाराच्या मदतीने हे कृत्य केल्याची कबुली पाेलिसांकडे दिली अाहे. या प्रकरणाचा निकाल काय लागताे याकडे नागपूरकरांचे लक्ष लागले हाेते. न्यायाधीशांनी अाराेपींना ‘तुम्हाला काय बाेलायचे अाहे काय?’ असा प्रश्न केला त्यावर दाेन्ही अाराेपींनी नकारार्थी उत्तर दिले.