आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अजित पवार, संदीप बाजोरियांना सिंचन प्रकरणात नोटीस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - विदर्भातील जिगाव आणि लोअरपेढी सिंचन प्रकल्प कंत्राटामध्ये झालेल्या अनियमितताप्रकरणी दाखल झालेल्या याचिकेवर नागपूर खंडपीठाने तत्कालीन जलसंपदामंत्री अजित पवार आणि बाजोरिया कन्स्ट्रक्शनचे संचालक आणि राजकीय नेते संदीप बाजोरिया यांना नोटीस बजावली आहे. तसेच २५ नोव्हेंबरपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

सामाजिक कार्यकर्ते अतुल जगताप यांनी याबाबत दाेन याचिका दाखल केल्या अाहेत. अजित पवार यांच्यामुळेच बाजोरिया कन्स्ट्रक्शन्सला या दाेन्ही प्रकल्पांचे कंत्राट मिळाल्याचा तसेच कंपनीचे संचालक आमदार संदीप बाजोरिया यांचे पवारांशी घनिष्ठ संबंध असल्याचे याचिकाकर्त्यांनी गुरुवारी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. बाजोरिया हे राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित आहेत. यामुळे या कंत्राटांमध्ये राजकीय हस्तक्षेप झाला असल्याचाही आरोप त्यांनी केला. कंत्राट मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे या कंपनीकडे नसल्याचे ‘अारटीअाय’मधून समाेर अाले अाहे. असे असताना त्यांना कंत्राट कसे देण्यात आले, असा सवालही याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी केला.

दोन्ही प्रकल्प पूर्ण नाहीत
दोन्ही प्रकल्पांच्या कामांसाठी विदर्भ सिंचन महामंडळाने कंत्राटदाराला अग्रीम रक्कम दिली असताना अद्याप दोन्ही प्रकल्प पूर्ण झालेले नाहीत. जिगाव प्रकल्पाचे काम २००८-९ मध्ये तर लोअर पेढीचे काम २००६-७ मध्ये देण्यात आले होते. सहा ते सात वर्षांमध्ये प्रकल्प पूर्ण होणे अपेक्षित असताना काहीच काम झालेले नाही, असा आरोप याचिकेत केला आहे.
बातम्या आणखी आहेत...