आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागपूर: गडकरी, देवेंद्रांंची उपराजधानीत चालली जादू, अकोला, अमरावतीतही एकहाती सत्ता

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर भाजपचे प्रभाग 1 चे सर्व विजयी उमेदवार. - Divya Marathi
नागपूर भाजपचे प्रभाग 1 चे सर्व विजयी उमेदवार.
नागपूर-  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासाठी अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या नागपूरात भाजपने अपेक्षेपेक्षाही दर्जेदार कामगिरी केली. यापूर्वीच्या निवडणूकीतील ६२ जागांमध्ये आणखी  ४६ जागांची भर घालत नागपूर पालिकेवर १०८ जागांसह आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. तर, वादविवादात अडकलेल्या काँग्रेसलाही नागपूरच्या जनतेने नाकारले. काँग्रेसला मागच्या निवडणूकीत ४१ जागांवर विजय मिळवला होता. मात्र, यंदा त्यांना अंतर्गत कलहाचाच फटका बसला आणि केवळ २९ जागाच्या त्यांच्या पदरी पडला. राष्ट्रवादीचीही अवस्था   झाली असून फक्त एका जागेवरच त्यांना समाधान मानावे लागले. मनसेच्या बाबतीत राज्यभराप्रमाणेच उपराजधानीतील चित्र राहीले. या निवडणूकीत त्यांना खातेही उघडता आले नाही. तुलनेने मागच्या निवडणूकीत त्यांच्या पदरी निदान दोन जागा तरी आल्या होत्या. शिवसेनेने नागपूरात तीन जागांवर विजय मिळवला असून त्यांनाही  २०१२ च्या तुलनेत यंदा ३ जागांचा फटका बसला आहे. 
 
अकोला, अमरावतीत एकहाती सत्ता 
अकोला आणि अमरावतमध्येही भाजपला एकहाती सत्ता मिळवण्यात यश आलेले आहे. अकोल्यामध्ये 80 जागांपैकी 48 जागा भाजपच्या खात्यात गेल्या आहेत. तर शिवसेना 8, काँग्रेस 13 आणि राष्ट्रवादी काँग्रेसला पाच जागा मिळाल्या आहेत. त्याशिवाय अपक्ष आणि इतर पक्षांना 6 जागा मिळाल्या आहेत. 
 
अमरावतीमध्ये 87 पैकी 45 जागा भाजपने जिंकल्या आहेत. त्याशिवाय शिवसेना 7 आणि काँग्रेस 15 शिवाय अपक्ष आणि इतरांना 20 जागा मिळाल्या आहेत. याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसेला खातेही उघडता आलेले नाही. 
 
 
 
UPDATES
 
 - 5.00 PM - अकोल्यात भाजप 3८, काँग्रेस 12 शिवसेना 4, राष्ट्रवादी काँग्रेस 5
 - 5.00 PM - अमरावतीत भाजप 3७, शिवसेना 4, काँग्रेस 6
 - 5.00 PM - नागपूरमध्ये भाजप 58, काँग्रेस 19
 - 3.00 PM - अकोल्यात भाजप 36, काँग्रेस 12 शिवसेना 4, राष्ट्रवादी काँग्रेस 4
 - 3.00 PM - अमरावतीत भाजप 30, शिवसेना 4, काँग्रेस ६
 - 3.00 PM - नागपूरमध्ये भाजप 48, काँग्रेस 14
- भाजपमध्ये दाखल झालेले राष्ट्रवादीचे माजी नागपूर शहर अध्यक्ष अजय पाटील यांच्या पत्नी प्रगती पाटील पराभूत.
- 2.00 PM - नागपूरमध्ये भाजप 44, काँग्रेस 14
- रेशीमबाग वॉर्ड : प्रभाग 31 (विजयी पॅनल)
अ - उषा पायलट - भाजप, सतीश होले - भाजप, शितल कामडे - भाजप, रवींद्र भोयर - भाजप
- 1.00 PM - नागपूरमध्ये भाजप 40 जागांवर आघाडीवर, काँग्रेसला 10 जागा
- 1.00 PM - अमरावतीत भाजपला 16 तर अकोल्यात 20 जागा
- 12.00 PM -अमरावतीत ८ तर अकोल्यातही बाजप ९ जागांवर आघाडीवर.
- 12.00 PM - अमरावतीत काँग्रेसच्या महापौर रिना नंदा पराभूत 
- 12.00 PM - नागपुरात भाजप 24 तर काँग्रेस 9 जागांवर आघाडीवर
- अमरावतीमध्ये सुरुवातीच्या मतमोजणीत भाजपची आघाडी
- अकोल्यात भाजपच्या रंजना विचणकर विजयी
- संघ मुख्यालय परिसरात चारही जागांवर भाजपचे उमेदवार आघाडीवर.
- 11.30 : अमरावती भाजपा 5 ठिकाणी आघाडीवर 
- 11.30 : अकोला -  ७ जागांवर काँग्रेसची आघाडीवर तर राष्ट्रवादी एका ठिकाणी आघाडीवर. 
- 11.30 : वाजता नागपुरात 19 जागांवर भाजप तर 4 जागांवर काँग्रेस आघाडीवर. 
- सुरुवातीला हाती आलेल्या निकालांनुसार भाजपच आघाडीवर.
- नागपुरातील पहिला कल भाजपच्या बाजुने. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...