आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गडकरी कन्येच्या विवाह साेहळ्यात खर्चिक झगमगाटाला देणार फाटा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कन्येचा विवाह सोहळा चार डिसेंबरला नागपुरात आयोजित होणार आहे. काही वर्षांपूर्वी भाजपाध्यक्ष असताना गडकरीपुत्राचा विवाह सोहळा श्रीमंतीच्या थाटापायी चर्चेचा विषय ठरला होता. त्यापासून धडा घेत अाता केंद्रात मंत्रिपदावर असलेल्या गडकरींनी चर्चा टाळण्यासाठी झगमगाट टाळण्याचा प्रयत्न केला.

गडकरी यांची कन्या केतकी हिचा विवाह नागपुरातील सामाजिक कार्यकर्ते रवींद्र कासखेडीकर यांचे पुत्र आदित्य याच्याशी होणार आहे. आदित्य हा अमेरिकेतील ‘फेसबुक’ कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून कार्यरत आहे. नागपुरातील वर्धा मार्गावरील एम्प्रेस पॅलेस येथे हा विवाह सोहळा होणार आहे. या सोहळ्यात गडकरी कुटुंबाच्या नातेवाइकांसह अतिशय निकटवर्तीय तसेच संघाची वरिष्ठ नेतेमंडळी अशा माेजक्या लाेकांनाच निमंत्रित करण्यात अाले अाहे.

गडकरींच्या घरचे लग्न म्हणजे पाहुण्यांची संख्या हजाराेंच्या संख्येने असणार यात शंका नाही. मात्र, या निमित्ताने हाेणारी गर्दी टाळण्यासाठी गडकरींनी चार स्वागत समारंभ आयोजित केले अाहेत. नागपुरातील पक्षनेते व कार्यकर्त्यांसाठीचा समारंभ रविवारी शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या पटांगणावर आयोजित करण्यात आला, तर मंगळवारी गडकरी यांच्या धापेवाडा गावात नागपूर ग्रामीणचे भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मेजवानी दिली जाणार आहे. विवाह सोहळ्यानंतर सहा डिसेंबरला राज्यातील सर्व पक्षांचे नेते, आमदार, मंत्री, खासदार यांच्यासाठी नागपुरातच स्वागत सोहळा होणार असून अाठ डिसेंबरला दिल्लीत गडकरी यांच्या निवासस्थानी केंद्रातील नेते व सेलिब्रिटींसाठी स्वागत सोहळा हाेईल.
बातम्या आणखी आहेत...