आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेळघाटमधील आदिवासींची दाण्यांसाठी पुरती ‘दाणादाण’; किमान अन्नाची हमी नाही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाराशर बुलबुले, धारणी- कुपोषण, पोटासाठी सातत्याने होणारे स्थलांतर, आरोग्याच्या अपुऱ्या सुविधा आदी लाखभर आदिवासींच्या समस्या सोडविण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडून ‘डिजीटल हरिसाल’चे डमरू वाजविले जाते. एकीकडे समस्यांनी जर्जर झालेल्या आदिवासींना माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जगाशी जोडण्याचा प्रयत्न होत आहे. धान्याची गोदामे भरलेली असतानाही अन्नाची सुरक्षा देणाऱ्या शासनाकडून धारणी चिखलदरा तालुक्यात दोन महिन्यांपासून साध्या रेशनचे धान्य पोहचल्याने आदिवासींची दाण्यांसाठी दाणादाण होत असल्याचे भीषण वास्तव उघड झाले आहे. हाताला काम नाही, खिशात पैसे नाही अशा अवस्थेत ‘गतीमान’ शासनाचे धान्य मेळघाटात ‘गती’ने का पोहचू शकत नाही असा सवाल आदिवासींकडून उपस्थित केला जात आहे. 

मेळघाटातील कुपोषण, माता मृत्यू पोटासाठी मुलं पोटाला बांधून होणारे स्थलांतर रोखण्यासाठी शासनाच्यावतीने लाखभर योजना राबविल्या जात आहे. त्यानंतरही मेळघाटातील विविध प्रमुख समस्यांचा कलंक पुसला जात नसल्याचे वास्तव आहे. त्यातच मेळघाटातून दरवर्षी हाताला काम राहत नसल्याने आदिवासी मोठ्या संख्येने दरवर्षी स्थलांतर करतात. त्यामुळे शासनाने रोजगार हमी योजनाही राबविली आहे. केंद्र शासनाने अन्न सुरक्षा विधेयक मंजूर केल्यानंतर आदिवासींना किमान अन्नाची हमी मिळाली होती. मेळघाटात दरवर्षी पावसाळ्यात बिकट समस्या निर्माण होते. शेकडो दुर्गम गावांचा संपर्क तुटतो. त्यामुळे आरोग्य, उर्वरित.पान
 
 
नवसंजीवनी योजना फसली? 
मेळघाटात पावसाळ्यात अनेक गावांचा संपर्क तुटतो. त्यामुळे अन्नधान्याचा तुटवडा निर्माण होऊ नये म्हणून शासनाच्यावतीने धान्य पुरवठ्यासाठी नवसंजीवन योजना सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गंत सप्टेबरपर्यंत पुरेल एवढे धान्य मे महिन्यातच पुरविणे आवश्यक होते. परंतु गतीमान शासनाची शासकीय यंत्रणाच मंद झाल्याने केवळ जून पर्यंतच धान्यसाठा करण्यात आला. उर्वरित धान्यसाठी प्रशासकीय अडचणींमुळे अद्यापही होऊ शकल्याने आदिवांसीवर उपासमारीची वेळ आली आहे. 

चलान भरूनही धान्याचा पुरवठा नाही 
चलान भरूनही धान्य पुरवठा होऊ शकल्याने दोन महिन्यांपासून वितरण करता आले नाही. गावकऱ्यांचा रोष वाढत आहे.
- रज्जू कास्देकर, स्वस्त धान्य दुकानदार, रा. चिपोली,ता. धारणी 

पैसा नसल्याने धान्य विकत घेणे कठीण 
दोन महिनेझाले धान्य मिळाले नाही. सध्या हाताला काम नसल्यामुळे पैशाअभावी खुल्या बाजारातून धान्य विकत घेणेही कठीण झाले आहे. 
- शालीकराम पटोरकर, लाभार्थी, रा. चिपोली,ता. धारणी. 

धान्याची मागणी 
पुरवठा शाखेकडे आम्ही तालुक्यातील गोदामनिहाय रेशनच्या अन्नधान्याची मागणी केली.परंतु वाहतूक कंत्राट अद्याप ठरल्याने ‘पीडीएस’चा साठा उपलब्ध नाही. धान्याचे वितरण होऊ शकले नाही. 
- प्रमोद एम शिंगाडे, प्रभारी तहसीलदार . 

त्वरित कार्यवाही करू 
तांदुळाचापुरवठाझाल्याने दुकानदारांनी गव्हाचीही उचल केली नाही. जानेवारी ते जूनचे धान्य मिळाले. पुढील कार्यवाही त्वरित करू . 
- अनिल टाकसाळे, जि.पु.अधिकारी. 
बातम्या आणखी आहेत...