आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संत संमेलनाचे उद्घाटन सबनीसांच्या हस्ते नाही!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दलच्या वादग्रस्त विधानामुळे अडचणीत आलेले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष प्राचार्य डॉ. श्रीपाल सबनीस यांचा अमरावती दौरा वांध्यात आला आहे. त्यामुळे येथे भरणाऱ्या पहिल्या अखिल भारतीय सर्व संत साहित्य संमेलनाचे उद्घाटन आता अ. भा. महानुभाव साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. पुरुषोत्तम नागपुरे यांच्या हस्ते केले जाणार आहे.

या संमेलनाचे आयोजक शरद जोध यांनी गुरुवारी एका पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. श्री संत नामदेव महाराज वारकरी पंथ विचार प्रसारक मंडळ अखिल भारतीय श्री संत नामदेव महाराज साहित्य परिषदेतर्फे आगामी सर्व ते ११ जानेवारीदरम्यान येथे पहिले अ. भा. सर्व संत साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. प्रा. डॉ. अशोक कामत (पुणे) यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या संमेलनाचे उद्घाटन प्राचार्य डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते केले जाणार होते. मात्र, सद्य:स्थितीत उद्भवलेला पेच लक्षात घेता आयोजकांनी खबरदारी घेतली असून, संमेलनाचे आयोजन स्वत: सबनीस असे दोघेही अडचणीत येऊ नये म्हणून हा निर्णय बदलला आहे. यासंदर्भातील खुलासा स्वत: जोध यांनी केला असून, आता या संमेलनाचे उद्घाटन पुरुषोत्तम नागपुरे करतील, अशी अधिकृत घोषणा त्यांनी केली आहे. संमेलनातील तीन दिवसांच्या वेळापत्रकाची माहितीही या वेळी देण्यात आली. समाजाची एकसंघता सर्वप्रकारच्या भेदा-भेदाला मूठमाती ही संतांची शिकवण असतानाही नेमके त्याच्या विपरीत कृती होत असल्याबद्दल चिंताही या वेळी व्यक्त करण्यात आली. पत्रकार परिषदेला जोध यांच्याशिवाय संमेलनाचे उद्घाटक पुरुषोत्तम नागपुरे, आयोजक असलेले माजी आमदार ज्ञानेश्वर धाने पाटील, निवृत्त प्राचार्य मुकुंद डोळे आदी मान्यवर उपस्थित होते.