आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विमुक्त भटक्यांना मिळणार जात प्रमाणपत्र, महसूल प्रशासन उपलब्ध करून देणार महत्वाचे दस्तावेज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यवतमाळ- अनेकदा भटक्या जाती जमातीच्या लोकांना त्यांच्या पाल्यांसाठी आवश्यक असलेले जातीचे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी आवश्यक असलेले महसुली दस्तावेज उपलब्ध होत नाही. त्यामुळे त्यांना जातीचे प्रमाणपत्र उपलब्ध होत नाही. ही बाब लक्षात घेता आता अशा लोकांना महसुली कागदपत्रे उपलब्ध करुन देण्यासाठी महसूल विभागाने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी अशा नागरिकांना केवळ १५ ऑगस्टच्या ग्रामसभेचा ठराव घ्यावा लागणार आहे.
 
आपल्या जिल्ह्यात अनेक जाती-जमाती या भटक्या प्रवर्गात येतात. याच्याशी निगडीत असलेले नागरिक कुठेही एका ठिकाणी वास्तव्यास राहत नसत. मात्र काळ बदलला तसे स्थायिक होऊ लागते आहेत. आज एकाच गावात गेल्या अनेक वर्षांपासून राहणारी या जाती-जमातींची लोक दिसून येतात. अशा परिस्थितीत या लोकांना त्यांच्या पाल्यांसाठी जातीची प्रमाणपत्रे मिळवताना अडचणींना सामोरे जावे लागते. मात्र असे नागरिक ज्या गावात स्थायिक झाले असतील त्या गावातील नागरिकांना त्यांच्याबद्दल माहिती असते. अशा नागरिकांना महसुली कागदपत्रे उपलब्ध करुन देण्यासाठी महसूल विभागाने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी आता १५ ऑगस्ट रोजी गावोगावी पार पडणाऱ्या ग्रामसभेमध्ये त्यांच्या गावात अशा प्रकारचे नागरिक राहत असेल तर त्यांची ओळख दर्शविणारा एक ठराव घ्यावा लागणार आहे.

त्यात हे नागरिक त्या गावात किती वर्षांपासून राहतात आणि ते कुठल्या समुदायाचे आहेत हे नमूद करावे लागणार आहे. हा ठराव एक पुरावा ग्राह्य धरुन अशा भटक्या, विमुक्त जाती-जमातीच्या नागरिकांना महसुली दस्तावेज उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. त्यामुळे या प्रवर्गातील नागरिकांना समाजाच्या मुख्य प्रवर्गात जुळवून घेण्यासही मदत होणार आहे.

या संधीचा उपयोग करुन घ्यावा
प्रशासनाच्या वतीनेअशा प्रकारच्या नागरिकांना महसुली कागदपत्रे उपलब्ध करुन देण्यास पुढाकार घेण्यात आला आहे. त्यासाठी काही गावात मदतही करण्यात आली आहे. मात्र अशा प्रकारच्या जास्तीत जास्त नागरिकांना मदत करता यावी या उद्देशाने ही उपाययोजना जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. त्यामुळे या नागरिकांनी १५ ऑगस्ट रोजी पार पडणाऱ्या ग्रामसभेत उपस्थित राहून तसा ठराव करुन घ्यावा आणि गावातील जाणकार नागरिकांनी ही माहिती त्या नागरिकांपर्यंत पोहोचवावी.’’
- सचीन तांगडे, उपविभागीय अधिकारी, यवतमाळ
बातम्या आणखी आहेत...