आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अन्न औषध प्रशासनाला दिली कारणे दाखवा नोटीस, पाच गोदामांतून मिनीट्रक भरून शहराबाहेर जाळला गुटखा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - जिल्हा धिकाऱ्यांच्याआदेशानंतर महसूल तसेच अन्न औषध प्रशासनाच्या पथकाने मंगळवारी (दि. २८) जाफरजीन प्लॉटमधील खत्री कॉम्पलेक्समध्ये धाड टाकून गुटखा पानमसाला भरलेली पाच गोदाम सिल केली होती. जप्त केलेला हा गुटखा जवळपास दोन कोटी रुपयांचा असल्याच्या निष्कर्षावर कारवाई करणारी यंत्रणा पोहाचली आहे. शहरात कोट्यवधी रुपयांचा गुटख्याचा साठा आढळून आल्याने अन्न औषध प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.दरम्यान,ही गंभीर बाब लक्षात घेऊन शहरामध्ये गुटख्याचा इतका साठा कसा झाला याबाबत विचारणा करून जिल्हाधिकाऱ्यांनी शुक्रवारी (दि. १) अन्न औषध प्रशासनाला नोटीस बजावली आहे. तसेच या कारवाईसंदर्भात विस्तृत अहवाल मागविला आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडून अन्न औषध प्रशासनाला गुटखा साठा मिळाल्यामुळे नोटीस देण्याची ही अलीकडच्या काळातील पहिलीच वेळ आहे.
शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या जाफरजीन प्लॉटमधील खत्री कॉम्पलेक्समध्ये कारवाई दरम्यान तब्बल दोन कोटी रुपयांचा गुटखा पानमसाल्याचा साठा उजेडात आला. मंगळवारी कारवाई केली त्यावेळी या गुटख्याचा साठा जवळपास ८० ते ९० लाख रुपयांचा असावा असा अंदाज होता. मात्र, गुरूवारी शुक्रवारी जप्त केलेला गुटखा पानमसाल्याचा साठा शहराबाहेर नेऊन जाळण्यासाठी जेव्हा वाहने बोलावण्यात आली.तेव्हा पाचही गोदाम खचाखच भरलेले होते.त्यामुळे जप्त केलेल्या गुटख्याच्या किंमतीचा अंदाज योग्य रितीने येऊ शकला नव्हता.
दरम्यान ही कारवाई सुरू असताना महसूल विभागाचे अधिकारी कर्मचारी यांच्यासोबत अन्न औषध विभागाचे अधिकारीसुद्धा उपस्थित होते. मात्र,कारवाई सुरू असताना त्यांच्याकडून अपेक्षित प्रतिसाद महसूल विभागाला मिळत नव्हता, तसेच गुटखा जाळण्यासाठी गुरूवारी मध्यरात्री जिल्हाधिकारी किरण गित्ते, तहसीलदार सुरेश बगळे पथकासह गेले होते. यावेळी अन्न औषध विभागाचे सहायक आयुक्त मिलिंद देशपांडे हे सुद्धा सोबत होते. एकंदरीत महसूल विभागाने केलेल्या कारवाईमध्ये अन्न औषध विभागाने पीतळ उघडे पडले. त्यामुळे या विभागाच्या अधिकारी,कर्मचाऱ्यांकडून पाहिजे तसा प्रतिसाद मिळाला नसल्याचे जिल्हाधिकारी किरण गित्ते यांना जाणवले, वास्तविक पाहत गुटखा किंवा पानमसाला यांवर कारवाई करण्याची जबाबदारीच मुळात अन्न औषध विभागाची असताना या विभागाकडून अपेक्षित सहकार्य मिळाले नाही.त्यामुळे महसूल विभागाने स्वत:ची यंत्रणा मनुष्यबळ वापरून कारवाई केली. अशा प्रकारे गुटखा पानमसाल्यावर झालेली ही जिल्ह्याच्या इतिहासातील पहिलीच कारवाई ठरली आहे. दरम्यान, गुरूवारपासून महसूल तसेच अन्न औषध प्रशासनाच्या पथकाने जप्त केलेला गुटखा शहरापासून २५ किलोमीटर अंतरावर असलेल्या पिंपळविहीर शिवारात नेऊन जाळला. जप्त केलेला गुटखा, पानमसाला, सुंगधित सुपारी, सुंगधित तंबाखू वाहून नेण्यासाठी तब्बल मिनीट्रक वापरण्यात आले.

कारणे दाखवा नोटीस बजावली
^शहरात गुटख्याचा साठा मिळणे ही गंभीर बाब आहे. गुटखा पकडण्याची जबाबदारी अन्न औषधी प्रशासनाची असताना आम्ही पुढाकार घेऊन कारवाई केली तेव्हा त्यांच्याकडून अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याचे आम्हाला जाणवले. त्यामुळे अन्न औषधी प्रशासनाचे सहायक आयुक्त मिलिंद देशपांडे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. किरणगित्ते, जिल्हाधिकारी.

अहवाल मागितला आहे
शहरातून कोट्यवधी रुपयांचा गुटखा पानमसाला जप्त करण्यात आल्याने मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या घडामोडींवर आधारीत अन्न औषधी प्रशासनाला विस्तृत अहवाल मागितला आहे. हा अहवाल शनिवारी (दि. २) मिळणार आहे. त्यानंतर या प्रकरणातील आणखी काही बाबी पुढे येणार असल्याचे महसूल विभागाच्या सूत्रांनी सांगितले आहे.

बातम्या आणखी आहेत...