आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Now Decide Will Soon, 'No Entry' For Heavy Vehicles

अवजड वाहनांना ‘नो एन्ट्री'; आता लवकरच हाेणार निर्णय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - शहरातील राजापेठ ते गांधीचौक मार्गावर एका भरधाव ट्रकने दोन महिन्यांपूर्वी अभियांत्रिकीच्या एका विद्यार्थिनीला चिरडले होते. या अपघातामुळे पुन्हा एकदा शहरातील बेशिस्त वाहतूक ‘नो एन्ट्री'चा मुद्दा ऐरणीवर आला होता. त्यानंतर गृहराज्यमंत्री पाटील यांनीही वाहतुकीचा आढावा घेवून पोलिस आयुक्त, महापालिका आयुक्त यांना वाहतूक सुधारणा करण्यासंदर्भात सूचना दिल्या होत्या. त्यामुळेच शहरात अवजड वाहनांना वर्दळीच्या वेळी ‘नो एन्ट्री' बाबत लवकरच निर्णय होणार आहे.
सद्य:स्थितीत अमरावती शहरात वर्दळीच्यावेळी मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची वाहतूक सुरू आहे. २०११ पासून नो एन्ट्रींच्या वेळांमध्ये बदल झालेला नाही. दोन वर्षांपूर्वी नो एन्ट्रीच्या वेळेत बदल करून सकाळी ते रात्री १० पर्यंत शहरात अवजड वाहनांना ‘नो एन्ट्री' बाबत पोलिसांनी अधिसूचना काढली होती मात्र काही वाहतूक संघटनांनी या वेळेला विरोध केला होता. त्यानंतर अनेक महिने हा मुद्दाच चर्चेत आला नाही. दरम्यान दोन महिन्यांपूर्वी अभियांत्रिकीच्या एका विद्यार्थिनीला भरधाव ट्रकने शहराच्या मघ्यवस्तीत चिरडले. त्यावेळपासून पुन्हा अवजड वाहनाच्या वाहतुकीचा शहरातील बेशिस्त वाहतुकीचा मुद्दा ऐरणीवर आला. गृहराज्यमंत्री डॉ.रणजित पाटील यांनी वाहतूक सुधारण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे आदेश देवून तीन दिवसांपूर्वी शहरातील काही ठिकाणांची स्वत: पाहणी केली. त्यादिवशीसुद्धा त्यांनी पोलिस अधिकाऱ्यांना आठ दिवसात आवश्यक ते बदल करण्याचे आदेश दिले. त्यामुळेच वाहतूक पोलिसांनी ‘नो एन्ट्री' संदर्भात नव्याने वेळेचे नियोजन केले असून, त्यासंदर्भात लवकरच अधिसूचना काढण्यात येणार आहे. नवीन अधिसूचनेप्रमाणे अवजड वाहनांना सकाळी ते रात्री १० पर्यंत शहरात प्रवेश राहणार नाही. असे असले तरी दोन वर्षांपूर्वी याच वेळेला विरोध झाला होता, आता काय होणार हे महत्वाचे ठरणार आहे. कारण अवजड वाहनांची वाहतूक शहरात झाल्यास अपघाताचे धोके कमी होतील. अपघातमुक्त शहरासाठी अवजड वाहनांची 'नो एन्ट्री' महत्वाची ठरू शकते.