आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आरोपी शिक्षकांनंतर मुख्याध्यापकांना अटक, शाळेत लैंगिक अत्याचाराचे प्रकरण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यवतमाळ- येथील वायपीएस शाळेमध्ये लहान मुलीवर दोन शिक्षकांनी केलेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेवर शनिवारी चौथ्या दिवशीही तीव्र पडसाद उमटले. घटनेच्या निषेधार्थ शेकडो लोक सकाळी १० च्या सुमारास संस्थेचे पदाधिकारी किशोर दर्डा यांच्या घरावर धडकले. त्यांच्या अटकेची मागणी करत जमावाने घरासमोरील परिसरात असलेल्या फलकांची तोडफोड केली.

पहिल्या इयत्तेत शिकणाऱ्या एका बालिकेवर यश बोरुंदिया आणि अमोल क्षीरसागर या शिक्षकांनी अत्याचार केल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला होता. यानंतर संस्थेच्या व्यवस्थापनाविरुद्ध पालक आणि विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन उभारले. दोन्ही शिक्षकांना अटक करण्यात आली. शिवाय या प्रकरणी हयगय करणाऱ्या शाळा व्यवस्थापनावर पोलिसांनी विविध कलमांनुसार गुन्हे दाखल केले. शुक्रवारी सकाळी शाळेचे मुख्याध्यापक जेकब दास यांनाही वडगाव रोड पोलिसांनी अटक केली. दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ शुक्रवारी सकाळी दारव्हा नाका येथे शेकडोंच्यासंख्येने पालक इतर नागरिक जमले. १० च्या सुमारास हा जमाव वायपीएसचे संचालक किशोर दर्डा यांच्या यांच्या निवासस्थानासमोर धडकला. जमावाने शेजारीच असलेल्या दर्डा उद्यानात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी मज्जाव केल्याने संतप्त जमाव प्रेरणास्थळाच्या परिसरात घुसरला. त्या ठिकाणी लावण्यात आलेल्या फोटोंची, फलकांची जमावाने तोडफोड केली.

दरम्यान संतप्त जमावाने पुन्हा दारव्हा नाका येथे दर्डा चौक आणि विजय दर्डा यांच्या विकास कामांच्या फलकांवर दगडफेक करून फलक तोडून टाकले. यावेळी पोलिसांना जमावाला पांगवण्यासाठी सौम्य लाठीमारही केला. सायंकाळी च्या सुमारास परिस्थिती नियंत्रणात आली. दरम्यान गेल्या चार दिवसांपासून वायपीएस शाळा आणि दर्डा यांच्या निवासस्थानी चोख पोलिस बंदोबस्त आहे. सायंकाळी पालकमंत्री संजय राठोड यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवनात पालकांची सभा घेतली.
पुढील स्लाइड्सवर वाचा, काय म्हणाले मुख्य मंत्र... काय म्हणाल्या महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर...
बातम्या आणखी आहेत...