आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चंद्रपूरसह १२ वीज केंद्रांत इको फ्रेंडली वीजनिर्मिती; प्रदूषण टळणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - चंद्रपूसह राज्यात १२ वीजनिर्मिती केंद्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून वीजनिर्मिती होत आहे. प्रदूषणाला आळा घालण्यासाठी ‘नॅचरल ड्राफ्ट कूलिंग टाॅवर’ उभारण्यात आले आहे. यामुळे आगामी काळात वीजनिर्मितीचा खर्चही कमी झालेला दिसेल, अशी माहिती िवस्तारित प्रकल्पाचे मुख्य अभियंता प्रदीप शिंगाडे यांनी दिली.
या केंद्रांमध्ये कोराडी येथील ६० मेगावॅटचे ३, भुसावळ येथील ५०० मेगावॅटचे २, खापरखेडा येथील ५०० मेगावॅटचा १, पारस व परळी येथील २५० मेगावॅटचे प्रत्येकी २ संच आणि चंद्रपूर येथील ५०० मेगावॅटच्या २ संचाचा समावेश आहे. चंद्रपूर केंद्राची क्षमता वाढावी म्हणून ५०० मेगावॅटचे दोन संच कार्यान्वित करण्याचे ठरले. संच क्र. ८ व्यावसायिक तत्त्वावर ४ जून २०१६ पासून कार्यान्वित झाला. संच क्र. ९ ची चाचणी सुरू आहे. जुलैअखेर तो सुरू होईल. यापूर्वी वीजनिर्मिती केंद्रात इंड्यूस ड्राॅफ्ट कूलिंग टाॅवरचा (आयडीसीटी) उपयोग होत होता. हे टाॅवर चालवण्यासाठी विजेचा वापर होत असल्याने खर्च अधिक होता. एनडीसीटीमध्ये टाॅवरचा इलेक्ट्रिकल व मेकॅनिकल देखभालीसह उभारणीचा खर्च १५८ कोटी, तर सिव्हिलसाठी ९६ कोटी खर्च येतो.
पाण्याची ६० ते ७० टक्के बचत
{चंद्रपूरच्या दोन्ही संचासाठी २६५/२७५ मीटर उंचीची एकच चिमणी उभारण्यात आली आहे.
{एनडीसीटीद्वारे गरम पाणी नैसर्गिकरीत्या थंड करण्यात येऊन त्याचा पुनर्वापर करण्यात येणार आहे. यासाठी विजेचा वापर करण्यात येणार नाही. त्यामुळे ४ ते ५ मेगावॅट विजेची बचत होणार आहे.
{कूलिंग टाॅवरचा देखभाल दुरुस्ती खर्च नगण्य असल्याने खर्चातही बचत होणार असल्याचे शिंगाडे यांनी सांगितले. या संचामध्ये शुद्ध पाण्याऐवजी साधे गाळण प्रक्रिया केलेले पाणी वापरण्यात येत आहे.
{राख बाहेर काढण्यासाठी अत्याधुनिक एचसीएसडी तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे आधी वापर होणाऱ्या पाण्यात ६० ते ७० बचत होणार आहे.

असे कमी होईल प्रदूषण
संचामध्ये अधिक कार्यक्षम टीडीबीएफपीचा (टर्बाइन ड्रिवन बाॅयलर फीड पंप) वापर करण्यात आल्यामुळे सहायक उपकरणासाठी लागणारी वीजही ४० ते ५० टक्क्यांपर्यंत कमी लागणार आहे. १४ ते १८ मेगावॅट विजेची बचत होत आहे. संच क्र. ८ व ९ करिता अत्याधुनिक तंत्रज्ञानाने ईएसपीचे काम केले आहे. ईएसपीची कार्यक्षमता ९९.९९ टक्के असल्यामुळे वातावरणातील धुळीचे कणाचे प्रमाण १०० एसपीएम वरून ५० एसपीएमपर्यंत कमी होणार असल्याने वायुप्रदूषणाला आळा बसेल. तसेच सांडपाणी प्रक्रिया केंद्र व जल उत्सर्जन प्रक्रिया केंद्र उभारून उत्सर्जित पाण्याचे प्रमाण शून्य टक्के करण्यात आले आहे.
बातम्या आणखी आहेत...