आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शास्त्रज्ञ आता ‘न्यूट्रिनो’तील ऊर्जेच्या शोधात!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र : डॉ. टी.एम. करडे, माजी कुलगुरू डॉ. बी. एस. राजपूत
अमरावती - शास्त्रज्ञ आता ‘न्यूट्रिनो’तील ऊर्जेचा शोध घेत आहेत. विद्युत भार (इलेक्ट्रिक चार्ज) आणि वस्तुमानविरहित (मासलेस) असलेल्या न्यूट्रिनोच्या ऊर्जेचे रहस्य शास्त्रज्ञांच्या उत्सुकतेचा विषय बनला आहे. ‘बिग बँग’ प्रयोगाच्या माध्यमातूनदेखील ‘गॉड पार्टिकल’चा शोध घेतला जात आहे. या नवीन ऊर्जेचा शोध घेण्यास शास्त्रज्ञांना यश आल्यास विश्वाच्या उत्पत्तीबाबत असलेले बरेच गूढ समोर येण्यास मदत होणार आहे.

अल्बर्ट आइनस्टाइन यांच्या सापेक्षता सिद्धांताला (जनरल रिलेटिव्हिटी) शंभर वर्षे पूर्ण होत असल्याने अमरावती येथील संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात आंतरराष्ट्रीय जनरल रिलेटिव्हिटी परिषद झाली. जगातून आलेल्या शास्त्रज्ञांनी या नवीन ऊर्जेच्या अस्तित्वाबाबत परिषदेत चर्चा झाल्याची माहिती उत्तराखंड येथील वैज्ञानिक तथा माजी कुलगुरू डॉ. बी. एस. राजपूत रायपूर येथील इंडियाना विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. टी. एम. करडे यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले. आकाशामध्ये आपलेच एक विश्व नाही, तर अनेक विश्व असल्याची कल्पना समोर आली आहे. मात्र, अद्याप दुसरे विश्व शास्त्रज्ञांना शोधता आले नाही. विश्वाची निर्मिती कशी झाली असेल, याबाबत ‘बिग बँग’ प्रयोग केला. दाबविरहित पोकळी (व्हॅक्यूम) अणूचे तुकडे करत विश्वाच्या निर्मितीचे गूढ माहिती करून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, या प्रयत्नात असलेले शास्त्रज्ञ पीटर हिग्ज यांनी अणूच्या केंद्रामध्ये ‘हिग्ज बोसोन’ म्हणजेच ‘गॉड पार्टिकल’ जगासमोर आणले. या शोधाबाबत पीटर हिग्ज फ्रन्सोइस यांना २०१३ मध्ये नोबेल पुरस्कारदेखील प्राप्त झाले. त्यानंतरदेखील जगामध्ये यानंतरचे शोध सुरूच आहेत. लिऑन लेडरमन यांनी एसएसबी (स्पान्टानिअस सिमेट्री ब्रेकिंग) म्हणजेच वस्तुमानविरहित असलेल्या कणामध्ये वस्तुमान तयार करणे शक्य असल्याचे म्हटले आहे. आधी ऊर्जा, गतिज ऊर्जानंतर आता नवीन ऊर्जेच्या शोधाच्या दिशेने शास्त्रज्ञांचा संशोधनाचा प्रवास सुरू झालेला आहे.

गुरुत्वाकर्षणावर झाली चर्चा
विद्यापीठगणित विभागातर्फे आयोजित या आंतरराष्ट्रीय परिषदेत ऊर्जेच्या विशेष करून गुरुत्वाकर्षण या ऊर्जेच्या प्रकाराबाबत चर्चा केली. डार्क एजर्नी, ब्लॅक होल एनर्जीसह विविध प्रकारच्या ऊर्जेबाबत संशोधकांकडून शोध प्रबंध सादर केले. चार दिवस चाललेल्या या आंतरराष्ट्रीय परिषदेत येथील विद्यार्थी संशोधकांना अनेक नवनवीन शोध कल्पनांचा अनुभव घेता आला.

‘फ्रोटोन’वरदेखील चर्चा : न्यूट्रानमध्येवस्तुमानविरहित कण ‘न्यूट्रिनो’ आढळला. त्याच प्रमाणे प्रोटानमधील ‘फ्रोटोन’बाबतदेखील संशोधन होत आहे. न्यूट्रिनोचेदेखील विविध प्रकार असल्याचे आढळले आहे. त्याच्या संशोधनातून वैज्ञानिकांच्या हाती बरीच माहिती लागण्याची शक्यता आहे. तीन प्रकारचे न्यूट्रिनोदेखील संशोधकांनी शोधून काढल्याची माहिती परिषदेत दिली.