आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता दररोज मिळेल पाणी, उन्हाची दाहकता वाढल्यामुळे मंगळवारीही होणार नियमित पाणीपुरवठा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - उन्हाचीदाहकता आणि अमरावती शहरात पाण्याची वाढती मागणी लक्षात घेता, आता आठवड्यातून एक दिवस बंद पाळल्या जाणाऱ्या मंगळवारच्या दिवशीही नियमित पाणीपुरवठा केला जाणार आहे.यापुढे दर आठवड्याला सुरळीत पाणीपुरवठा होणार असल्याने अमरावतीकरांना दिलासा मिळाला आहे. मात्र, ज्या वेळी दुरुस्ती किंवा आवश्यक काम असेल त्याच वेळी कोणतीही पूर्वसूचना देता पाणीपुरवठा बंद ठेवला जाणार असल्याचे मजीप्रचे अधीक्षक अभियंता प्रशांत भामरे यांनी सांगितले.
नागरिकांना पिण्याचे पाणी मिळावे याला आम्ही प्राधान्य देतो. याआधीही मंगळवारी सण,उत्सव असल्यास आम्ही कामे बाजूला ठेवून पाणीपुरवठा केल्याचेही मजीप्रातर्फे सांगण्यात आले. आॅक्टोबरमध्येच मजीप्राच्या अधीक्षक अभियंत्यांनी पाणीपुरवठा आणखी तीन-चार महिने मंगळवारी बंद राहणार असल्याचे सांगितले होते. या कालावधीत नळजोडणीशी संबंधित १०० टक्के अडचणी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सोडवणार असल्यामुळे उन्हाळ्यात शहरातील नागरिकांना पूर्वीप्रमाणेच पाणी मिळेल. नागरिकांच्या सोयीसाठीच आठवड्यातून एक दिवस पाणी बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याचेही ते म्हणाले होते.

शहरातील सबनिस प्लाॅट, नमुना गल्ली, अंबापेठसह इतर भागातही नळाशी संबंधित अनेक समस्या होत्या. त्या आम्ही दर मंगळवारी सोडवण्याचा प्रयत्न केला. त्यापैकी काही अडचणी दूर झाल्या असून, काही अद्याप शिल्लक असल्याचे मजीप्राने सांगितले.

गत २९ सप्टेंबरपासून दर मंगळवारी शहराचा पाणी पुरवठा बंद ठेवण्याचा मजीप्राने निर्णय घेतला होता. तेव्हापासून मंगळवारी जर सण आला तर तो मंगळवार वगळता इतर मंगळवारी नळाला पाणीच यायचे नाही. मात्र, उन्हाळ्यात अमरावतीचे तापमान चांगलेच वाढते. त्यामुळे एकही िदवस नळाला पाणी आले नाही तर नागरिकांची चांगलीच गैरसोय होते. ही समस्या लक्षात घेता आता आठवडाभर सुरळीत पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
आठवड्यातील एका दिवसाच्या (मंगळवार) ब्रेकअपमध्ये सिंभोरा येथील शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या ७५० अश्वशक्तीच्या चार पंपांची देखभाल दुरुस्ती, उर्ध्व आणि गुरुत्व, वाहन नलिकांवरील एअर सर्व्हिसिंग वाॅल्व्हची दुरुस्ती, उंच टाक्यांचे इनलेट आऊटलेट वाॅल्व्ह तसेच पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणे, अमरावतीत असलेल्या १६ विभागातील नलिकांमधील घाण पाणी काढून टाकणे, एखाद्या ठिकाणी कचरा अडकला असेल तो काढणे, तपोवन येथील जलशुद्धीकरण केंद्रातील फिल्टर ब्लेड स्वच्छ करणे आणि येथील वाॅल्व्हची देखभाल दुरुस्ती करणे ही कामे पूर्ण केली जायची.

नागरिकांच्या सोयीसाठी दररोज पाणी
^शहरातीलनागरिकांच्यासोयीसाठी दररोज नळाला पाणी येणार असून, मागणी वाढल्यामुळे मंगळवारीही पाणीपुरवठा बंद राहणार नाही. मात्र, दुरुस्ती किंवा अन्य काही कारणांसाठी पूर्वसूचना देता पाणीपुरवठा बंद ठेवला जाऊ शकतो. प्रशांत भामरे, अधीक्षकअभियंता, मजीप्रा. ॉ
...तरीही गैरसोय होऊ दिली नाही
कोणत्याही समुदायाच्या सणाच्या दिवशी जर मंगळवार असेल तर त्या दिवशी पाणीपुरवठा सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, आता उन्हाळ्यामुळे दररोज पाण्याची मागणी वाढल्यामुळे मंगळवारीही नळाला पाणी येणार असल्याचे मजीप्रातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

असे अमरावतीतील पाण्याचे गणित
वर्षाला ५६ दशलक्ष घनलीटर पाणी वापरण्याची सरकारकडून परवानगी.
नोव्हेंबर २०१५ पर्यंत अमरावतीकरांनी ४० दशलक्ष घनलीटर पाणी वापरले.
उर्वरित तीन महिन्यांत १६ दशलक्ष घनलीटर पाणी वापरण्याची मुभा.
अमरावतीकरांना लागते १२५ दशलक्ष लीटर पाणी.
दिवसाला ९५ दशलक्ष लीटर पाणी साठवणूक शुद्धीकरण क्षमता.
एप्रिलपर्यंत जिल्ह्यातील धरणांचा पाणीसाठा
पर्यंत पुरेल इतका पाणीसाठा अप्पर वर्धा धरणामध्ये आहे शिल्लक .