आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वर्षा सत्पाळकरला वर्षाकाठी तब्बल सव्वा कोटीचे ‘पॅकेज’

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - मैत्रेय कंपनीच्या मुख्य संचालक असलेल्या वर्षा सत्पाळकर स्वत:च्याच कंपनीमध्ये ‘चेअरमॅन अॅन्ड मॅनेजिंग डायरेक्टर’ पदावर कार्यरत असताना त्यांना कंपनीकडून दोन वर्षांपूर्वीच वर्षाकाठी तब्बल कोटी २८ लाख रुपयांचे पॅकेज दिले जात होते. म्हणजे महिन्याकाठी सत्पाळकरला तब्बल १० लाख ३३ हजार रुपये पगार होता. ही रक्कम गुंतवणूकदारांनी कंपनीमध्ये गुंतवलेल्या पै पै रकमेमधूनच घेतल्याचे आर्थिक गुन्हे शाखा पोलिसांच्या तपासात गुरूवारी (दि. २९) पुढे आले आहे.

मैत्रेय कंपनी ही १९९८ पासून महाराष्ट्रात कार्यरत आहे. गंुतवणूकदारांना रक्कम गुंतवल्यास भूखंड, विमाकवच देण्याचे आश्वासन कंपनीने दिले होते. विशेष म्हणजे मैत्रेयमध्ये अत्यल्प रक्कमेची सुद्धा गंुतवणूक करता यायची, त्यामुळे दिवसाकाठी १०० रुपये दराने मजुरी करणाऱ्या व्यक्तीनेसुद्धा आपल्या सुखी भविष्याचे स्वप्न पाहून या कंपनीमध्ये गुंतवूणक केली. अशाप्रकारे मैत्रेयचे गुंतवणूकदार केवळ अमरावतीतच नव्हे तर संपूर्ण राज्यभरात विखुरलेले आहेत. अमरावती शहरात पोलिसांकडे तक्रार करणाऱ्या गुंतवण्ूकदारांची संख्या ११ हजारांच्या आसपास आहे, अजूनही अनेक गुंतवण्ूकदार पोलिसांकडे तक्रार देण्यासाठी येतच आहे. यावरून मैत्रेयच्या गुंतवणूकदारांची संख्या लक्षात येते. अमरावतीत आलेल्या गुंतवणूकदारांच्या फसगतीची रक्कमसुद्धा ते कोटींच्या घरात पोहोचली आहे. दुसरीकडे तपास करणाऱ्या आर्थिक गुन्हे शाखेने आतापर्यंत मैत्रेयची कोट्यवधी रुपयांची स्थावर जंगम मालमत्ता तसेच विविध बँकांमध्ये असलेली रोख रक्कम उघड केली आहे. दरम्यान कंपनीच्या व्यवहाराची विस्तृत माहिती घेण्यासाठी २०१४ मध्ये ज्या सीएने मैत्रेयचे अंकेक्षण केले होते. त्या सीएला बोलवले होते. त्यांच्याकडून पोलिसांना मिळालेली माहिती तपासाकरिता महत्त्वपूर्ण ठरणारी असूनए त्या सीएचा जबाबही पोलिसांनी नोंदवला आहे. शिवाय या संचालकांनी गोरगरिबांच्या गुंतवण्ूक केलेल्या रकमेची कशा प्रकारे ‘एैशी तैशी’ केली, ते सुद्धा पुढे आले आहे. कंपनीच्या मुख्य संचालक ज्यांना अद्याप अटक झालेली नाही, त्या वर्षा सत्पाळकर मैत्रयच्या चेअरमन अॅन्ड मॅनेजिंग डायरेक्टर पदावर कार्यरत असून, त्यांना कंपनीकडून दरमहा तब्बल १० लाख ३३ हजार रुपये पगार देण्यात येतो. तसेच वर्षा सत्पाळकर यांचा भाऊ जनार्धन अरविंद परुळेकर हा सुद्धा कंपनीमध्ये संचालक आहे. तो सुद्धा मैत्रेयमध्ये कार्यरत असून, त्याला महिन्याकाठी लाख ३३ हजार रुपये वेतन दिले आहे. ही वेतनाची रक्कम २०१४ मधील आहे. त्यामुळे आता दोन वर्षांत तर या दोघांच्याही वेतनात आणखी वाढ झाली असू शकते,अशी माहिती पोलिसांनी दिली.
दरम्यान, पोलिसांना तपासादरम्यान मैत्रेयच्याच नावाचे जळगाव जिल्ह्यातील सावदा येथील बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये एक खाते असल्याची माहिती मिळाली होती. या खात्यात १४ लाख रुपये असून, ते गोठवण्याबाबत पोलिसांनी बँकेला पत्र दिले आहे. त्यासोबतच आणखी तब्बल १७ वेगवेगळ्या नावांच्या कंपनी उघड झाल्या आहेत. यापैकी १२ कंपनीच्या संचालक वर्षा सत्पाळकर आहे. या सर्व कंपन्या मैत्रयच्याच असून, या कंपनीचे आर्थिक व्यवहार एकमेकांसोबत दाखवण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

या आहेत नव्या कंपन्या : मैत्रेय सर्व्हीसेस प्रायव्हेट लिमीटेड, मैत्रेय अशोरंन्स सर्व्हिसेस प्रा. लि., मैत्रेय मास कम्युनिकेशन सर्व्हिसेस प्रा. लि., मैत्रेय हॉटेल्स अॅन्ड रिसोर्ट्स प्रा. लि., मैत्रेय मॅगानेट प्रा. लि., ग्रीन प्लॅनेट रिअल टॉर्स प्रा. लि., मैत्रेया प्लॉटर्स अॅन्ड स्ट्रक्चर्स प्रा. लि., मैत्रेय रिअल टॉर्स अॅन्ड कंन्स्ट्रक्शन प्रा. लि., मैत्रेय बिल्डर अॅन्ड डेव्हलपर्स प्रा. लि., मैत्रेय मास मिडीआ प्रा. लि., मैत्रेय रुरल ग्रोथ वेंचर प्रा.लि., मैत्रेय मेगा सेल इन्फ्रा प्रा. लि. यासह श्री शिवशांती कन्स्ट्रक्शन्स अॅन्ड मायनिंग प्रा. लि., अजमेरा रिअलटर्स प्रा. लि., मैत्रेय कन्सलटन्सी सर्विसेस प्रायवेट लिमीटेड या कंपण्यांबाबत पोलिस माहिती घेत आहे.
आरबीआय सेबीकडूनही ‘ऑडिट’
मैत्रेय कंपनीने अशा प्रकारचा व्यवसाय करू नये म्हणून आरबीआयने यापुर्वीच कंपनीला कळवले होते.त्यावेळी कंपनीचे नाव बदलवून दुसऱ्या कंपनीच्या नावाने व्यवसाय सुरूच ठेवला होता. दरम्यान मैत्रेयचे आरबीआय सेबीकडूनही ऑडिट सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. मैत्रेयच्या तपासात आम्हाला आर्थिक व्यवहारासंबधी अधिक माहिती घेण्यासाठी आम्ही सीएला बोलवले होते. त्यांच्याकडून २०१४ मधील कंपनीच्या आर्थिक व्यवहाराची माहिती मिळाली आहे. गणेश अणे, पोलिस निरीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा.
बातम्या आणखी आहेत...