आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आग्रेकर हत्‍या प्रकरण: पश्चिम बंगालमधून मुख्‍य आरोपीला अटक, दुसरा पळून जाण्‍यात यशस्‍वी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- नागपूरमधील लॉटरी व्‍यवसायिक राहुल आग्रेकर यांच्‍या हत्‍येप्रकरणी आरोपी पंकज हारोडेला पश्चिम बंगालमधून अटक करण्‍यात आली आहे.  हावडामधील एका लॉजमधून त्‍याला अटक करण्‍यात आली. मात्र दुसरा आरोपी दुर्गेश बोकडे पळून जाण्‍यात यशस्‍वी झाला आहे. 21 नोव्‍हेंबरोजी नागपूरमधील लॉटरी व्‍यवसायिक राहुल आग्रेकर यांचे अपहरण करुन हत्‍या करण्‍यात आली होती. दोन्‍ही आरोपी हे नागपूरचे रहिवासी असून पंकज हारोडे हा लॉटरी व्‍यवसायिक आहे तर पळून जाण्‍यात यशस्‍वी झालेला दुसरा आरोपी दुर्गेश बोकडे याचा विटांचा व्‍यवसाय आहे.

 

1 कोटीच्‍या खंडणीसाठी झाली होती हत्‍या
विदर्भातील सर्वात मोठे लॉटरी व्यावसायिक म्हणून ओळखल्या जाणारे सुरेश आग्रेकर यांचा मुलगा राहुल (वय ३६) याचे 21 नोव्‍हेंबररोजी अपहरण करण्‍यात आले होते. 'राहुलचे अपहरण केले असून त्याला सुखरूप सोडायचे असल्यास १ कोटी रुपये लागतील', असे अपहरणकर्त्‍यांनी राहुल यांच्‍या कुटुंबियांना फोन करुन सांगितले होते. मात्र काही निर्णय घेण्यापूर्वीच राहुल यांचा अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह बुटीबोरी परिसरात 22 नोव्‍हेंबररोजी आढळून आला होता.

 

पुढील स्‍लाइडवर...फोटो..

बातम्या आणखी आहेत...