आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दर्यापुरात देशी कट्ट्यासह आरोपी गजाआड,

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दर्यापूर- नाकाबंदी रात्र गस्तीवर असलेल्या पोलिसांना एका युवकाच्या संशयास्पद हालचाली दिसून आल्याने पोलिसांनी त्याची अंग झडती घेतली असता, त्याच्याजवळ देशी कट्टा आढळून आला. ही घटना शुक्रवारी (दि. १९) रात्री दीड वाजताच्या दरम्यानची घडली. पोलिसांनी तातडीने युवकाला ताब्यात घेतले. गजानन जानराव खेडकर (२२) रा. बनोसा असे ताब्यात घेण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे.

शुक्रवारी रात्र गस्तीवर असलेल्या पोलिस पथकाला दर्यापूर-अकोट रोडवरील विद्युत कार्यालयाजवळ गजानन खेडकर हा अंधारात संशयीतरित्या फिरताना दिसून आला. पोलिसांनी संशयाच्या आधारे त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ विना परवाना लाकडी मुठ लोखंडी बॅरल असलेला देशी कट्टा आढळला. पोलिसांनी याबाबत विचारणा केली असता समाधानकारक उत्तरे मिळाली नाही. या प्रकरणी पोलिसांनी त्याच्यावर विनापरवाना शस्त्र बाळगल्या प्रकरणी विविध गुन्हे दाखल करून अटक केली. ही कार्यवाही ठाणेदार नितिन गवारे, पोलिस उपनिरिक्षक अमोल ढोकणे, सहाय्यक पोलिस निरिक्षक प्रवीण तडी, प्रशांत ढोके आदींनी केली. शुक्रवारी त्याला न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. विनापरवाना शस्त्र बाळगणाऱ्या आरोपीचा मुख्य उद्देश काय होता, त्याने हे शस्त्र कशासाठी आपल्या जवळ बाळगले,ते कुठून आणले वा कुणी दिले,याचा तपास सुरू आहे.

यापूर्वीही झाली होती अटक
दर्यापूर-अकोटरोडवरील बनोसा परिसरातील वाढदिवसाचे शुुभेच्छा फलक फाडल्यावरून मारहान केल्या प्रकरणी परस्परविरोधी तक्रारीवरून गजानन खेडकर याला यापूर्वीही अटक करण्यात आली होती. या प्रकरणात मध्यवर्ती कारागृहातील शिक्षेनंतर न्यायालयाच्या जामीनावर त्याची सुटका झाली होती.
बातम्या आणखी आहेत...