आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पेठइतबारपूर येथे अज्ञात तापाने विद्यार्थ्याचा मृत्यू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दर्यापूर- तालुक्यातील पेठइतबारपूर येथे तेजस राजू भोरखडे (१५) नामक विद्यार्थ्याचा अज्ञात तापाने रविवारी मृत्यू झाला असून, त्याच्यावर सोमवारी (दि. १) दुपारी वाजता पेठइतबारपूर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

तेजस नवव्या वर्गात शिकत होता आणि तो मूर्तिजापूर येथे मामाकडे राहत होता. दरम्यान, चार दिवसांपूर्वी त्याला ताप आल्याने अकोला येथे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान रविवारी रात्री नऊच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. सोमवारी शवविच्छेदन अहवालानंतर त्याचा मृतदेह पालकांच्या स्वाधीन करण्यात आला. त्याच्यावर पेठइतबारपूर येथे अंत्यंसस्कार करण्यात आले. तेजसचे आईवडील मोलमजुरी करतात. अज्ञात तापाने तेजसच्या झालेल्या मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे गावात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. तेजसचा मृत्यू नेमका कोणत्या तापामुळे झाला,हे स्पष्ट होऊ शकले नाही.
बातम्या आणखी आहेत...