आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेगळ्या विदर्भासाठी हवी एकहाती सत्ता, मुख्यमंत्र्यांना पाठिंबा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - आम्ही वेगळ्या विदर्भासाठी पूर्ण बहुमत मागितले होते. पण आम्हाला पूर्ण बहुमत मिळालेले नाही. महाराष्ट्रात आमचे युतीचे सरकार आहे तर केंद्रात राज्यसभेत बहुमत नाही. त्यामुळे पूर्ण बहुमत मिळेपर्यत वेगळा विदर्भ देणे शक्य नाही, अशी कोलांटउडी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस मुरलीधर राव यांनी बुधवारी मारली. नागपूरमध्ये ते पत्रकारांशी बाेलत हाेते.
‘भाजपने वैदर्भीय जनतेला आश्वासन दिले होते. निवडून आल्यावर वेगळा विदर्भ देऊ, असे जनतेला सांगून भाजप सत्तेवर आली. मग आता आश्वासनापासून दूर का पळता?’ या प्रश्नावर मुरलीधर राव म्हणाले, ‘भाजप दिलेली आश्वासने पूर्ण करणारा पक्ष अाहे. आम्ही जनतेला एक हाती सत्ता मागितली होती. जनतेने आम्हाला ती दिली नाही. त्यामुळे तुर्तास विदर्भ वेगळा देता येणे शक्य नाही. अखंड महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असल्याचे फडणवीस यांचे वक्तव्य एकदम बरोबर आहे. पक्ष त्यांच्यासोबत आहे’, असेही ते म्हणाले.

डाळीला काँग्रेस जबाबदार : सध्या तूरडाळीचे भाव आवाक्याबाहेर गेले आहे. पण याला काँग्रेस सरकारच जबाबदार आहे. देशात तूरडाळीचे उत्पादन १७ दशलक्ष टन असून मागणी २३ दशलक्ष टनाची आहे. पाच दशलक्ष टनाची तूट भरून काढायची आहे. येत्या दोन वर्षात तूर डाळीबाबतही स्वयंपूर्ण होऊ, असे राव म्हणाले.

सुलेखा कुंभारे करणार सांकेतिक उपोषण
बहुजन रिपब्लिकन एकता मंचातर्फे वेगळ्या विदर्भासाठी ९ आॅगस्टला सकाळी ९ वाजता संविधान चौकात सांकेतिक उपोषण करण्यात येणार असल्याची माहिती मंचच्या अध्यक्षा सुलेखा कुंभारे यांनी दिली. देवेंद्र फडणवीसांच्या अखंड महाराष्ट्राचा मुख्यमंत्री या वक्तव्यामुळे संभ्रम निर्माण झाला असून भाजपने भूमिका स्पष्ट करावी, असे त्या म्हणाल्या.
पुढे वाचा... विदर्भासाठी हवी स्वतंत्र प्रदेश काँग्रेस समिती
बातम्या आणखी आहेत...