आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गडचिरोलीत पोलिस जवानांवर नक्षलवाद्यांचा गोळीबार; 1 जवान गंभीर जखमी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सांकेतिक छायाचित्र. - Divya Marathi
सांकेतिक छायाचित्र.
गडचिरोली/नागपूर- कोरची पोलिस ठाण्यातंर्गत येणाऱ्या कोडगुल पोलिस मदत केंद्रावर कार्यरत असणाऱ्या 2 पोलिस कर्मचाऱ्यांवर नक्षलवाद्यांनी गोळीबार केल्याची घटना घडली आहे. या गोळीबारात आशिष मडावी हा जवान गंभीर जखमी झाला आहे.
 
मनित हारामी व आशिष मडावी हे दोन जवान मोटारसायकलवरुन कोरची येथे गेले होते. नक्षलवाद्यांनी तेथे त्यांच्यावर गोळीबार केला. मडावी हा या घटनेत गंभीर जखमी झाला आहे. पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी मडावी यांच्यावरील उपचारासाठी हेलीकॉप्टर रवाना केले. मडावी यांना कोरची येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. प्राथमिक उपचार करुन त्यांना हेलीकॉप्टरने नागपुरला नेण्यात आले आहे.
बातम्या आणखी आहेत...