आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गडचिरोलीत नक्षलवाद्यांशी चकमकीत जवान शहीद; दाेघांवर नागपुरात उपचार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सांकेतीक फोटो - Divya Marathi
सांकेतीक फोटो

नागपूर- गडचिरोलीच्या गॅरापत्ती पोलिस मदत केंद्राच्या हद्दीत पड्याळमेटा जंगलात साेमवारी नक्षलवाद्यांनी पोलिस पथकावर केलेल्या हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलिस दलाचा मंजुनाथ (३१, धारवाड) हा जवान शहीद झाला. लोकेशकुमार व दीपक शर्मा (उत्तर प्रदेश) हे जवान जखमी झाले. जखमींना हेलिकॉप्टरने नागपुरात हलवण्यात आले. नक्षल हल्ल्यात जवान शहीद होण्याची ३ दिवसातील ही दुसरी घटना आहे. 


गॅरापत्ती पोलिस मदत केंद्रातील सीआरपीएफ ११३ बटालियन व पोलिसांच्या ६० जवानांची तुकडी पड्याळमेटा जंगलात गेली होती. मात्र दबा धरून बसलेल्या सशस्त्र नक्षल्यांनी त्यांच्यावर हल्ला चढवला. सुरुवातीला पोलिसांचा दबाव पाहून नक्षलवादी पळून गेले. त्यामुळे पोलिस पथक गाफील झाले.  नक्षलींचे पथक जवळच्या पहाडावर चढून पोलिसांवर नजर रोखून होते.  पोलिस अंधारात घटनास्थळाची पाहणी करत असल्याचे संधी साधून नक्षलींनी गोळीबार केला. 

 

नक्षली पहाडावर तर पाेलिस पायथ्याशी
नक्षली पहाडावर व पोलिस पायथ्याशी असल्याने पोलिसांना लक्ष्य करणे त्यांना सोपे होते. चकमकीत सहभागी जवान वॉकीटॉकीवरुन वरिष्ठांना माहिती देत होते. मात्र, पोलिसांच्या बोलण्याचा आवाज येताच नक्षलवादी गोळीबार करीत होते. त्यामुळे पोलिसांना संदेश देणे बंद करावे लागले. 

 

छत्तीसगड दलमचा सहभाग  
या घटनेत छत्तीसगड दलमचा सहभाग होता आणि नक्षलवाद्यांची संख्या तीस ते चाळीसच्या घरात होती, असा आमचा अंदाज असल्याची माहिती महानिरीक्षक शेलार यांनी दिली.

 

पुढील स्‍लाइडवर वाचा, घनदाट जंगलात मदत पथकाची रात्रभर 25 किलोमीटरची पायपीट...

 

बातम्या आणखी आहेत...