आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कांदा झाला आणखी तिखट, व्यापाऱ्यांची दिवाळी, शेतकऱ्यांचा मात्र तोटा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- बाजारात कांद्याची आवक घटली असून, शहरात कांद्याचे भाव कडाडले अाहेत. किरकोळ बाजारात सरासरी ४० ते ५० रुपये प्रती किलो दराने कांदा विकला जात आहे. बाजार समितीत कांद्याला आज बुधवारी सरासरी ठोकमध्ये तीन हजार रुपये प्रती क्विंटल दर मिळाला. परंतु, या भाववाढीचा फायदा या वर्षीही नित्यनेमाप्रमाणे व्यापाऱ्यांनाच होत आहे. जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत या वर्षी कांद्याचे उत्पादन कमी झाले आहे. परंतु, नाशिकच्या मुख्य कांदा बाजारात कांद्याचे भाव वधारल्याने त्याचे पडसाद येथील बाजारातही उमटले आहेत. मागील तीन-चार दिवसांपासून ठोक बाजारात कांद्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीत सरासरी सध्या दोनशे क्वटल कांद्याची आवक होत आहे. बाजार समितीत कांद्याला आज किमान दोन हजार, तर कमाल चार हजार रुपये प्रती क्विंटल दर मिळाला. किरकोळ बाजारात कांदा सरासरी ४० ते ५० रुपये प्रती िक्वंटल दराने विकला जात आहे.

शेतकऱ्यांचा तोटाच :
जिल्ह्यातीलबागायत पट्ट्यात पांढऱ्या रब्बी कांद्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. या वर्षी अवकाळी पाऊस गारपीटमुळे कांद्याचे मोठे नुकसान झाले होते. कांद्याचा हंगाम सुरू झाल्यानंतर शेतातून कांद्याला सरासरी ६०० ते ७०० रुपये प्रती क्विंटल दर मिळाला. बहुतांश शेतकरी शेतातूनच कांदा विकत असल्यामुळे साठवणूक करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या नगण्य आहे. साठवणूक करणारे शेतकरी साधारणत: पोळ्यापर्यंत कांद्याची साठवणूक करतात. या वर्षी खरीप आणि रब्बी हंगामातील बहुतांश पिकांना जबर फटका बसल्याने ज्या शेतकऱ्यांकडे कांदा होता त्यांना नाइलाजाने पैशाच्या गरजेपोटी कांदा विकावा लागला. या शेतकऱ्यांना सरासरी हजार ते दीड हजार रुपये प्रती क्विंटल दर मिळाला. दरम्यान, अद्यापही मोजक्याच शेतकऱ्यांकडे कांदा शिल्लक आहे. या शेतकऱ्यांकडून ग्रामीण भागातील व्यापारी सरासरी अडीच ते तीन हजार रुपये दराने कांदा खरेदी करीत आहेत. त्यामुळे वाढलेल्या भाववाढीचा फायदा शेतकऱ्यांपेक्षा व्यापाऱ्यांनाच अधिक होत आहे.

बाजारातलाल कांद्याची आवक नाही :
नाशिकच्याबाजारात कांद्याचे दर वधारले असून, अल्प पावसामुळे आवक घटली आहे. याचा परिणाम येथील बाजारावरही झाला असून, नाशिकच्या लाल कांद्याची आवक बंद झाली आहे.

दर्जानुसार भाव
ग्रामीणभागात कांद्याची सध्या अडीच ते तीन हजार रुपये भावाने खरेदी सुरू आहे. दर्जा पाहून कांद्याला भाव दिला जात आहे. मकसूदभाई, कांदा व्यापारी.

व्यापाऱ्यांची दिवाळी
शेतकऱ्यांनीआर्थिक गरजेपोटी बेभाव कांदा विकल्यानंतर व्यापाऱ्यांनी या कांद्याची साठवणूक करून ठेवली आहे. दरम्यान, आता कांद्याचे दर वधारल्याने या भाववाढीचा फायदा व्यापाऱ्यांना अधिक होत आहे. सरासरी हजार रुपये दराने खरेदी केलेल्या कांद्याला सध्या तिप्पट नफा मिळत असल्याने व्यापाऱ्यांची दिवाळी झाली आहे.