आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अाॅनलाइन गंडा घालणारे जण पाेलिसांच्या ताब्यात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- आमिषदाखवून ऑनलाइन पद्धतीने लोकांना लाखो रुपयांनी गंडवणारी आंतरराष्ट्रीय टोळीला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले. दिल्लीतील सफदरगंज येथून या टाेळीतील सहा जणांना अटक केली असून त्यांना ट्रान्झिट रिमांडवर नागपुरात आणले आहे. या टोळीतील दोघे नायजेरियाचे नागरिक असून चार जण मणिपूरचे रहिवासी आहेत.
संडे मायकल मेदुबुईके (वय ३३, नायजेरिया), केनेथ उकवाईओकाका (वय ३७, नायजेरिया) असे टोळी प्रमुखांचे नाव आहे. त्यांच्यासोबत लैसराम हेमंता इंगो सिंग (३०), थॉडम चिंगलेसाना सिंग (२२), नितीन युम्नम सिंग (२४) आणि गंगबम अमरजित सिंग (२२, सर्व रा. मणिपूर) अशी आरोपींची नावे आहेत. हे सर्व आरोपी सध्या दिल्लीतील सफदरजंग परिसरात राहात होते.

नागपुरातील एका केंद्रीय कार्यालयात सहायक वैज्ञानिक पदावर कार्यरत असलेल्या एका घटस्फोटित महिला कल्पनाने (बदललेले नाव) या भामट्याच्या टाेळीने गंडा घातला हाेता. तिने याविषयी तक्रार दाखल केल्यानंतर नागपूर पाेलिसांनी दिल्ली पाेलिसांच्या मदतीने ही कारवाई करत अाराेपींच्या मुसक्या बांधल्या.
बातम्या आणखी आहेत...